STORYMIRROR

vaishali vartak

Others

3  

vaishali vartak

Others

अक्षर बाजारी

अक्षर बाजारी

1 min
171

गेले अक्षर बाजारी

फेर फटका सहज   

किती त-हा अक्षरांच्या

माझी भागली गरज   


काही अक्षरे रोजची

निवडली आवडीने

 आली दुसरी धावत

 घेऊ त्यांना सवडीने


 मनी जमता अक्षरे

गर्दी केली अक्षरांनी

दाटलेल्या भावनांना

वाट दिधली शब्दांनी


शब्द शब्द जोडताना

झाली काव्याची तयारी

मन म्हणे बरे झाले

आले अक्षर बाजारी


शब्द शब्द वेचताना

मन माझे आनंदले

शांत करुण भक्तीचे

भाव पण उमटले.


Rate this content
Log in