अभंग
अभंग


श्री स्वामी समर्थ । अर्पितो सुमन ।
करितो वंदन । स्वामी राया ।। १ ।।
प्रेमळ माऊली । दयेचा सागर ।
भक्तांचे आगर । ती माऊली ।। २ ।।
नाम मुखी घेता । क्लेश ताप हरे ।
ध्यान सदा करे । भक्तजन ।। ३ ।।
पुजा अर्चा करू । फुलांनी सजवू ।
नैवेद्य भरवू । पुरणाचा ।। ४ ।।
आरती ओवाळू । गाऊ भक्ती गीत ।
लावुनी संगीत । प्रेमभावे ।। ५ ।।
गुरवार दिनी । आरती सोहळा ।
रंगतो राऊळा । समर्थाच्या ।। ६ ।।
भजन किर्तन । तालात सूरात ।
करती जोरात । स्वामीभक्त ।। ७ ।।
आनंदी सोहळा । नयनी पहावा ।
जीव तो सुखावा । दर्शनाने ।। ८ ।।
जय जय स्वामी । करुया गजर ।
राऊळी हजर । भक्तगण ।। ९ ।।
जय घोष करू । प्रसन्न चित्ताने ।
स्मरण मुखाने । समर्थाचे ।। १० ।।