आवडती मालिका
आवडती मालिका
ह.म.बने.तु.म.बने फार भारी
रात्री दहा वाजता लागणारी
सोनी मराठीवर, रात्री जेवणानंतर
सर्वांना पाहायला मिळणारी.
एकमेव सीरीयल टी.वी.वरची
एकत्र बसून कुटुंबाने पाहायची
आपल्या घरातल्या गोष्टी सांगणारी
खूप काही सर्वांना शिकायला द्यायची.
विरळ झाल्या एकत्र कुटुंबपद्धती
पण बने पाहून वाढते आसक्ती
गुण्या गोविंदाने संसार करणारी
एकमेकांवरची पाहून त्यांची भक्ती.
एक सून ऑफिसात तर दुसरी घरात
आजी,आजोबा, नातवंडांचा गोतावळा
लहानांच्या तसेच मोठ्यांच्या प्रश्नांची उत्तरे
सही सलामत सोडवण्याचा सोहळा.
बऱ्याच टी.वी. सिरियल प्रस्तुत होतात
पण एकत्र बसून बघण्याच्या नसतात
आपण चॅनल बदलतो किंवा उठून जातो
फक्त बने एकत्र बसून बघत असतात.
