आठवणीतला पाऊस
आठवणीतला पाऊस
1 min
153
पहिल्यांदाच येणारा,
जमिनीच्या भेगांना भरणारा
मातीतून सुगंध पसरणारा,
असा आठवणीतला पाऊस ||१||
रिमझिम बरसणारा,
चिंब भिजवणारा,
भान हरवून सोडणारा
असा आठवणीतला पाऊस ||२||
गर्जनेसह येणारा,
मुसळधार कोसळणारा,
मनात धडकी भरवणारा,
असा आठवणीतला पाऊस ||३||
श्रावणात येणारा,
मुक्काम ठोकणारा,
सुट्टीचे कारण देणारा,
असा आठवणीतला पाऊस ||४||
इंद्रधनु पेलणारा,
ओढ जीवा लावणारा,
बाणांसम पाऊसधारा वर्षवणारा
असा आठवणीतला पाऊस ||५||