आठवणीतला भीमराव
आठवणीतला भीमराव
महु गावाच्या कुशीतून, एक हिरा चमकला
निळा टिका कपाळावर लावून,
जगभरात चमकला, नाव त्याचे होत भिमराव.
जाती, धर्म वेगळे असले
तरी तुम्ही दिलेल्या संविधानातून
समानता शिकलो आम्ही
तुम्ही वेचल आयुष्य,
सामांन्यांच्या सुखासाठी,
आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही
भिमराव केवळ तुमच्या लढ्यामुळे
वैज्ञानिकदृष्टया पाणी आग विझवते,
पण माझ्या भिमरावाने, पाण्यालाच आग लावली
भुकेलेल्या पक्ष्यांवर तु,कसे उपकार केलेस,
एकच घोट भिमा पिलास तू,
मात्र सारे तळे चवदार केलेस
देऊन गेला भिमा तु, दुःख मुक्तीचा मंत्र
अज्ञानास ही लावुन गेला तु शिक्षणाची गोडी,
या छोट्याश्या दुनियेत तु,दलितांना स्थान दिले,
एकजुटीने राहा असा संदेश देऊन गेलास तू
आजही तिरंग्यावर भिमा दलितांची शान आहे
ही दलितांची ओळख भिमा तुझ्यामुळेच
अस्तित्वात आहे,
सगळ्याच नेत्यात आमचा भिमराव भारी ठरला,
कारण भिमराव आमचा सगळ्यांचाच बाप होता
आली होती काळी रात्र,6 डिसेंबर 56 साली
अवघ्या भिमलेकरांच्या डोळ्यात
आश्रव आणणारी.
मानवतेच्या झऱ्यापुढे तो काळही थिजला होता
असा एक भिमपुत्र चैत्यभुमीवर निजला होता
राग नको येऊ देऊ देवा,करू नको हेवा
33 कोटी देवांच्यावर मानतो आम्ही भिमरावाला
येऊ द्या कितीही नेते पिढ्यानपिढ्या
पण भिमा तुझ्या नावाचा दरारा कधीही
संपणार नाही या जगात
विसरणार नाही कधीही
भिमा तुझ्या कार्याची महती
तूच आमचे मंदीर, तूच आमची मूर्ती.
धन्य झाली ही पावनभूमी,
मस्तक माझे भिमा तुझ्या चरणी,
मृत्युलाही लाजून गेला,
असा होता हा आमचा भिमराव,
म्हणुनच आता मरण आले तरी चालेल,
पण आता आम्ही,
भिमा तुझी लेकरं,
शरण कधी जाणार नाही,
शरण कधी जाणार नाही
