आठवणी
आठवणी
1 min
360
फार विचित्र असते ना?
आठवणींचं वेळीअवेळी येणे..
कधी सुखद अनुभूती देणे
तर कधी नकळत आसवे गाळणे..!!
कधी कधी वाटते
आठवणी उगाच येतात छळायला..
तर कधी कधी असंही वाटते की,
आठवणी हव्यात हळुवार पाळायला..!!
कोणत्याही पाहुणचाराची अभिलाषा न बाळगता
किंवा कोणत्याही अपमानाची तमा न बाळगता
आठवणी निरंतर येत राहतात
सुख दुःखाचे हिंदोळे नित्यनेमे घेत राहतात..!!
आठवणी नकळत घेऊन जातात
वर्तमानातून भूतकाळात
तसेच भूतकाळातून भविष्यात..
क्षण येतात आणि क्षण जातात
आठवणी मात्र निरंतर सोबत असतात..!!
