आठवणी (अष्टाक्षरी रचना)
आठवणी (अष्टाक्षरी रचना)
1 min
363
पावसात चिंब दोघे
ओठावर होती गाणी
थुईथुई नाचली ती
अल्लड प्रेम कहाणी
सागरा भेटण्या धावे
सरीता जणू कामिनी
घनघोर कुंतल ते
रुळती पाठीवरुनी
थेंब टपोरे ओघळे
प्रियेच्या गालावरुनी
आले आभाळ भरुनी
डोळा दाटले ग पाणी
गेले
ते दिन गेले ग
राहिल्या त्या आठवणी
