आठवण
आठवण
1 min
261
अजूनही आठवतो तो पहिला पाऊस
ढगांच्या गडगडाटात
विजेच्या चमचमाटात
तुफानी वाऱ्यासोबत
गर्जना करणारा
अजून आठवतो तो पहिला पाऊस
बंद दारांना धडश्या मारणारा
साऱ्यांच्या उरात धडकी भरवणारा
वाटसरूंना सपके मारणारा
अजून आठवतो तो पहिला पाऊस
काळ्जाचं पाणी पाणी करणारा
पण धरतीची तहान भागवणारा
मनाला आनंद देणारा
अजून आठवतो तो पहिला पाऊस
प्रेयसीच्या डोळ्यातून पाझरणारा
प्रियकराच्या मिठीत झेपावणारा
पहिला पाऊस पहिला पाऊस
