STORYMIRROR

उमेश तोडकर

Others

5  

उमेश तोडकर

Others

आपट्याचं सोनेरी पान

आपट्याचं सोनेरी पान

1 min
443

पाने तोडून मने जोडता येत नाहीत

आपट्याची पाने वाटून, 

दिवस सोनेरी होत नाहीत

आपट्याची झाडे तोडून, 


मने जोडता येत नाहीत

अन् कांचनमृगाचे पान देऊन

प्रेम कधी होत नाही

असावा लागतो मनाचा गोडवा,

भेटावा लागतो प्रियकर सखा

व्हावी लागते मीरा अन् राधा


पाने देऊन मन जोडता आलं असतं तर

आपट्याचंही सोनं झालं असतं

कांचनमृगाच्या झाडाला, सोन्याचा बहर आला असता

निसर्गानेही लोकांवर प्रेमाचा वर्षाव केला असता

पण... असं नाही होत कधी, जसं माणसाला वाटतं


म्हणूनच मित्रानो, झाडाची पाने तोडून

सोनं कधी कोण वाटतं?

नका तोडू झाडं, नका तोडू पानं

हातात हात देऊन द्या, दसऱ्याच्या शुभेच्छाचा मान

आपलाच हात होईल तेव्हा, आपट्याचं सोनेरी पान


Rate this content
Log in