"आपल कोणीतरी"
"आपल कोणीतरी"
1 min
381
मन मोकळ करायला
एक असा खांदा हवा की
त्या खांद्यावर डोकं टेकवताच
मन हलक व्हायला हवं
मन हलकं व्हायला
एक आधार असा हवा की
हात पाठीवर ठेवताचं
अश्रुंनी मोकळ व्हायला हवं
एक हात असा हवा की
आपलेपणाची साथ देताना
ओघळणाऱ्या अश्रुंना
पुसायला हवं
अश्रु पुसताना
आधाराचा हात घेता घेता
खांद्यावर डोक टेकवून
मन मोकळ झाल्यावर
मन जपायला
आपलं कोणीतरी हवं
