STORYMIRROR

Shobha Wagle

Others

4  

Shobha Wagle

Others

आजीची आठवण

आजीची आठवण

1 min
3.5K

बालपणाचा काळ सुखाचा

आठवतो सुट्टीत गावातला

आजीच्या मायेच्या छायेत

स्वर्गसुखाच्या आनंदातला


उन्हाळ्याचा रानमेवा 

मनसोक्त खेळ पोहण्याचा

संध्याकाळी शुभंकरोती म्हणूनी

आजीच्या गोष्टी ऐकण्याचा


गोष्टीचे भांडार होते आजीकडे

एकापेक्षा एक अजब गोष्टी

आवडे मज साऱ्याच कहाण्या

"चतूर कुमाराची" होती सर्वश्रेष्ठी


चातुर्य कुमाराचे राक्षसा मारण्याचे

नोकराच्या बहाण्याने फसविले

संधी मिळताच दोन हात करुनी

राक्षसा मारुन राजकन्येला सोडविले


कन्येला पाहुनी राजा राणी आनंदले

पणानुसार अर्धे राज्य अन् राजकन्येचा

विवाह झाला त्या गरीब कुमाराशी

रंकाचा राजा झाला आनंद त्या गोष्टीचा


सुट्टीतले बरेच काही गेले विसरुनी

पण आजीची गोष्ट त्या काळची

माझ्या मनात घर करुनी राहिली 

नातवास सांगते ती गोष्ट आजीची


Rate this content
Log in