आज सोनियाचा दिन
आज सोनियाचा दिन
आज आहे सोनियाचा दिन खास
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा मंगल क्षण
प्रभू रामचंद्रांची सजणार मूर्ती
अर्पण त्यासाठी तन,मन,धन...
जेथे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म जाहला
तिथेच आज पवित्र मंदिर उभारले
मूर्ती प्रभू श्रीरामाची स्थापित होतेय
सारे जग आज राममय जाहले...
सर्वामुखी आहे राम,राम, राम
घडतोय घरातूनच अयोध्या धाम
गोड नाम गाता, गाता श्रीरामाचे
घडतोय आपल्या सर्वांना चारीधाम....
वाजतोय मृदंग,उजळल्या दाही दिशा
जनता सजली, अयोध्या गावही सजला
प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी
मानवी देह भक्तिमय रसमय जाहला....
चैतन्य वसलेय आज अयोध्या नगरीत
सत्संगही लाभतोय याच नगरीत
आनंदाचे क्षण लुटावेत या नगरीत
प्रभू रामचंद्रांचे दर्शन होतेय या पावन भूमीत.....