आई
आई
1 min
14K
आई तुझ्यापुढे
जग सारे फिके
काय वर्णू तुझे मोल
शब्द होती माझे मुके।
तुझे आशिर्वाद आई
लाखमोलाची शिदोरी
तान्हुल्याच्या हितासाठी
रात्रंदिन कष्ट करी।
तुझी कृपाछाया असता
यश माझ्यापाठी धावे
तुझ्यापुढे प्रेमळ नेत्रांचे
सिंचन अविरत लाभे।
तुझ्या स्नेहल स्पर्शानी
भरे माझे पोट
आस मनाला लागली
जशी जन्माजन्माची भेट।
"तु" ग कान्हाची बासरी
म्हणे कुणी साय
नाही ज्याला आई
त्याचे दुःख सांगू काय?
