आई
आई
1 min
334
शब्दात सामावले या
सामर्थ्य किती
प्रेम तिचे लपले
दोन शब्दांच्या पोटी.
चंदनासारखी झिजते ती
आपुल्या बाळासाठी
करत राहते कष्ट जन्मभर
त्याच्या कल्याणासाठी.
करते संस्कार त्याच्यावर
वळण ती चांगले लावते
चार माणसात बोलायचे कसे
ती त्याला शिकवते.
करते मुलांना लहानाचे मोठे
भान याचे नाही कुणास
विझून जाते वात जेव्हा
येते आठवण तिची सर्वांस
