STORYMIRROR

Janhavi kumbharkar

Others

4  

Janhavi kumbharkar

Others

आई

आई

1 min
22.3K

 आई उन्हाची सावली, 

आई मायेचा पदर, 

तिने पांघरली आम्हावर, 

तिच्या मायेची चादर. 


पाटीवर गिरवून श्री, 

शिकविले आम्हा अ, आ, ई, 

घर काम, आमचा अभ्यास, 

न थकता ती करत राही. 


आईमुळे आहे, 

घरास आमच्या घरपण, 

लक्षात असतात तिच्या, 

तिथी, वार, सण पण. 


आल्यागेल्याचे स्वागत हसून ती करते, 

खाल्ल्याशिवाय कोणास असंच नाही ती सोडते, 

आलेला पै पाहुणा पोट भरून खातो, 

अन्नपूर्णा सुखी भव असं तिला म्हणतो. 


बाबा म्हणतात आहे ती, 

लक्ष्मी माझ्या घरची, 

तीच आहे अन्नपूर्णा, 

आई माझ्या मुलांची. 


हल्ली शिकली आई, 

यु ट्यूब बघायला, 

रोज मेजवान्या खास, 

मिळतात मात्र आम्हाला. 


नवनवीन प्रयोग ती, 

स्वयंपाक घरात करते, 

इतक सार बळ ती, 

कुठून एकवटून आणते. 


लिहू तितकं थोडं आहे, 

अशी माझी आई, 

तूच काशी, तूच मथुरा, 

तूच माझा साई. 


Rate this content
Log in