STORYMIRROR

somadatta kulkarni

Others

4  

somadatta kulkarni

Others

आई

आई

1 min
234


पहिले पाऊल टाकायला

तिने शिकविले

लडखडत्या पाऊलांना

आधार जिने दिले 

ती......... माझी आई    १


माझ्या बोबड्या बोलात

स्वर्गीचा आनंद तिला

माझ्या पहिल्या शब्दांत

जिने स्वर्ग अनुभवला

ती........... माझी आई  २


काऊ चिऊचा घास देताना

तूझ्या आनंदाला पार नाही

मला घास भरवताना 

स्वर्ग जिला दोन बोटे राही

ती.......... माझी आई   ३


स्वतःच्या सुखाची जिला

मुळी पर्वा नाही

माझ्या आनंदातच जी

आपुला आनंद पाही

ती.......... माझी आई   ४


आयुष्याचे तिचे यश

माझ्या यशातच पाही

त्याविना दुसरे जीवनाचे

उद्दिष्ट जिचे नाही

ती.......... माझी आई    ५


आयुष्यात जिच्या विना 

मज दुसरे दैवत नाही

मातृ देवो भव यासम

मंत्र मज गमत नाही

ती......... माझी आई     ६


Rate this content
Log in