आई-मी:ती
आई-मी:ती
नजर फिरवत होतो,
तेव्हा तू दिसली,
वाटलं आवाज द्यावा तूला,
पण त्यात तुझी वाटचं होती दूसरी......
शेवटी शोधत राहिलो मी,
जिकड-तिकड खूूंनस,
नजरेच्या आड नजरेच्या पल्याड,
फक्त तुझ्यासाठी वेडसरपणाने,,,,,
हाती काहीच नव्हतं लागत,
वाहणाऱ्या जगासोबत वाहत असतांना सुद्धा,
चक्रव्याजे प्रमाणे वाढत होते वय,
तरीही तुझ्यासाठी वाटायचं नाही स्वतःची आपुलकी,,,,,,
तू अस्तित्व दाखवतांना वाटायचं,
जीवाभावाची फक्त तूच आहेस,
एकदाही विचार केला नाही सोडतांना मला,
तेव्हा कळलं जीवाभावाची माझी आईच आहे,,,,,,
रोखून धरलं होतं स्वप्न,
आता कळते ते तर तुझ्यासाठी नव्हतंच,
गुन्यागोविंदान जगायचं आहे,
जगावेगळ माझ्या आईसाठी,,,,,,,
आई तुझा आशीर्वाद माझ्यास सदैव पाठीशी असू दे ......
