STORYMIRROR

Shakil Jafari

Others

3  

Shakil Jafari

Others

आई बाप

आई बाप

1 min
217

आईबापा साठी

खपत राहावे

जगावे मारावे

लेकरांनो।

त्यांचारे शब्दाला

सारेच पेलावे

फुलासम झेलावे

स्वखुशीने।

धर्माचा आदेश

मानारे आभार

स्वर्गाचे ते द्वार

मायबाप।

अनुभवाचे बोल

मिळेलरे मेवा

केले तर सेवा

दिनरात।

जरी स्वर्गवासी

करावे नमन

स्मृतीला पावन

वाकुनिया।

आईबाबा म्हणजे

जिन्याचे हुरूप

देवाचे रे रूप

पृथ्वीवर।

फिटणार नाही

जीव दिलेजरी

किती केलेतरी

ऋणत्यांचा।

अल्लाहचा आदेश

अहंकार त्यागा

आदबीने वागा

त्यांच्यापुढे।

नाराज आईबाबा

तोच रे अभागी

'शकील' या जगी

दुजा नाही।



Rate this content
Log in