आई बाबांसोबत जगणं
आई बाबांसोबत जगणं
1 min
425
शहरात येवून माझं सुखात राहणं
गावात माझ्याविना आई बाबांचं एकटं राहणं
माझ्यासाठी त्यांच आपल्या सुखाशी हरण...
इतका कसा मी कठोर झालो
कसं विसरलो आई बाबांसोबत जगणं...
माझ्यात त्यांची सारी आहेत स्वप्नं
माझं का हे त्यांच्या पासून लपन
कसं कळेना ठीक नाही माझं वागणं....
काही मिळवण्यासाठी विसरलो नाती
डोळ्यात त्यांच्या मी काही ना हाती
आठवण काढून त्यांच माझ्यासाठी रडणं...
आई बाबा माफ करा हो मला
परत येईल संगम वचन देतो तुम्हाला
मला तुमच्या हातात हात घालून गाव फिरणं...
