आग्र्याहून सुटका
आग्र्याहून सुटका
औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिनी
शिवबास बोलावले दिल्ली दरबारी
महाराष्ट्राच्या नेत्याचा मान न देता
दिली गेली जागा सामान्य सरदारी
अपमान केलेला नाही झाला तो सहन
उभारली तलवार दाखवण्या त्यांचा जोश
औरंगजेब वाटच पाहत होता त्या कृतीची
शिवबांना व शंभूराजेस तत्काळ केले बंदिश
कडक बंदोबस्त शिवबांच्या कैदेचा
गुरुवारी प्रसाद वाटण्याचा केला बहाणा
पडताळुन पाहण्यास वैतागले पहारेकरी
संधी साधली पेटाऱ्यातून पलायनाची
वेषांतर करुनी धरली वाट मथुरेची
कैदेतून सुटणे जे अशक्य त्याच्या बापास
निसटले शिवबा, अपमान घोर औरंगजेबाचा
अरावलीतून महाराष्ट्र, प्रवास झाला चाळीस दिवस
साधूसंत वेषात भेटण्या आले माँ साहेबांस
सारे करी प्रणाम उभे राहुनी, एक धरी चरण
अश्रू पडले पायावर, निसटला तेव्हा शेला
तत्काळ ओळखुनी शिवबास दिले आलिंगन
