आगमन पावसाचे
आगमन पावसाचे
1 min
240
थेंब थेंब आकाशातून
पडत राहू दे पृथ्वीवरती
सरीवर सरी पडत राहूदे
आसुसलेल्या पिकावरती
बरेच दिवसाचा दुरावा होता
आज नभातून पूर्ण झाला
पावसाच्या आगमनाने
निसर्ग सारा बहरून गेला
ओल्या चिंब धारणीवरती
सलग थेंब हा पडू लागला
ओढे नाले वाहू लागले
पाऊस वारा वाहू लागला
गार वाऱ्याच्या झुळकी बरोबर
पाऊस थेंब पडू लागला
अवघी धरणी तृप्त झाली
निसर्ग सारा डोलू लागला
पाऊस आला पाऊस आला
निसर्ग सारा आनंदून गेला.
