STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

आभास हा

आभास हा

1 min
415

आभास हा छळतो मला,

होतास तू माझा सखा बनुनी

गेलास तू का जीव लावूनी

जीव हैराण हा झाला शोधुनी।।१।।


क्षणोक्षणी होतो का आभास हा,

आठवणीत माझ्या असतोस तूच

जीव हा माझा कासावीस होऊन,

शोधत बसतो सारखे तुलाच।।२।।


संदेश हा काळ घेऊनी आला

देशासाठी लढता प्राण हा गेला

जाण्याआधी सर्वांची हौस तू पुऱ्या केल्यास

आभास हा होतो, पुन्हा मी येतो बोलून गेलास।।३।।


मी राहिले उभी, आकांतात झुरण्याचे सोडून

मीच आता लेक अन बाबा होईन

आम्हाला हसताना पाहशील तू रे

अर्ध राहिलेले स्वप्न, मीच करीन पूरे।।४।।


Rate this content
Log in