आभाळ
आभाळ
1 min
196
आभाळ बोलते काही
दिसे सुंदर निरभ्र
ढगांना कळले नाही
काळोखात दिसे शुभ्र ||१||
आभाळ बोलते काही
ढग दाटले अंगनी
वर्षाव होता सरींचा
अश्रु दाटती नयनी ||२||
आभाळ बोलते काही
बेधुंद वारा सांगतो
ढगांचा गडगडाट
अंगणी साद घालतो ||३||
आभाळ बोलते काही
येती पावसाच्या सरी
विज चमकुनी वाटे
परतीची वाट धरी ||४||
आभाळ बोलते काही
धरनी ऐकते गुज
येतो घेऊनी पावसा
करतो मनीचे गुज ||५||