आभाळ भरलंया
आभाळ भरलंया
1 min
87
अंगणी आभाळ येते
घेऊनी पाऊसधारा
शिंपूनी जातो वसुधेवर
कृष्णमेघांचा फवारा...
मयुर खुलवितो पिसारा
आनंदाने नृत्य करतो
पावसाची मजा घ्यायला
आपले पंख पसरतो...
वृक्षवल्लरी चिंब
भिजती पावसाने
पानोपानी बहरतात
धूंद फुले हर्षाने...
पाखरांचे गुज मनीचे
जलसा चालला जणू
इंद्रधनूच्या सप्तरंगात
हिंदोळ्याचा वेणू...
थांबला भासे जणू काळ
या सुंदर, स्वच्छ अंगणी
भविष्याच्या गर्भात सारे
नृत्य करतात नभांगणी...
