अ, आ, ई
अ, आ, ई
1 min
170
या लाडक्या मुलांनो तुम्ही
शाळेत लवकर, भरभर या
प्रार्थनेला तुम्ही हजर रहा
शाळेत मुलांनो रोज या....
प्रार्थनेला हात नीट जोडा
पसायदान नित्य म्हणा
प्रतिज्ञेतून तुम्ही मुलांनो
एकजूट, समभाव जाणा.....
वर्गात नीट, शिस्तीने वागा
अभ्यास छान, अचूक करा
शिस्तही छान, छान पाळा
वाईटास नको मुळी थारा....
उपक्रम ते ही बनवा
प्रकल्पात रस घ्यावा
गृहपाठ नित्य करा
मैदानी खेळ खेळावा...
फळ्यावरचे पाहून छान
पाटीवर अ, आ, ई लिहा
गाणीही गोड गोड म्हणा
प्रयोग करून नीट पाहा....
गप्पा नका कधी मारू
पुस्तकातील घ्यावे ज्ञान
वाचून तयांचे करूनी
जगात मिळवू मोठा मान....