म्हणून तुला तरी येऊ दे कीव पुढच्या वर्षी तरी बरसून टाक आमच्या आयुष्यातं नीव
त्याचं कर्ज माफ व्हावं म्हणून केले जातात संप, काढले जातात मोर्चे
बाप माझा कोरडवाहू शेतकरी त्याने परिस्थितीशी सामना केला ! अन् पोरांबाळाकडे बघून जीव नाही झाडावर टांगला...
फौजफाटा घेऊन सोबत करताय त्यांचा बंदोबस्त नष्ट करुन शेती करताय पिढ्या त्यांच्या उध्वस्त
उभं करपल रान कसा खेळ नियतीचा... नाव शेतीच ऐकुनी. गोळा उठतो भीतीचा...
बाप महा शेतकरी काळ्या मातीत राबतो घाली भूई आड दाणा स्वप्न उद्याचे बघतो ।।