STORYMIRROR

Rahul Kosare

Others

4  

Rahul Kosare

Others

आली रोवणी रोवणी

आली रोवणी रोवणी

1 min
430

आली रोवणी रोवणी

नभ बरसले दाटूनी

नभाच्या ओल्या सरींनी

ओली चिंब भिजली माता धरणी


आल्या आया बहिणी शेतामधी

माय पूजा केली नारळ फोडूनी

आशीर्वाद सदा असू दे धरणी माते

सार पिक हिरव येवू दे फुलूनी


शेतात राबतो माझा बळी

हातात नांगर पकडूनी

ढवळ्या पवळ्याच्या सोबतीने

रोवणी करतो चिखल करूनी


रोवणी खांब काढलं छान

खांब लावितो चार, पाच

पिक वाढलं नाचत डोलत

बळी खुश पाहून पिकावर सोनेरी साज


Rate this content
Log in