बैल पोळा
बैल पोळा
1 min
376
आला आला बैल पोळा
चला साजरा करू थाटामाटात
माझ्या सर्जा राजाचा सन आला
आनंदाने नाचत
सजल सार गांव पंढरपूर नगरी
राजा परी सजले ढवड्या पावड्या माझे
अंगावर नक्षीदार झुलि रंगी बेरंगी रंगांनी रंगले
सजले सारे बैल आनंदाने नाचले
गावं सार रे जमलं देवळाच्या चौथूऱ्याशी
पाहण्यास देखणी डौलदार जोडी
ढोल ताशांच्या गजरात शंकराचे पोवाडे रंगले
तोरण तोडण्यास सारे बैल आनंदाने सुटले
कसा फेडू रे बैला, तुमचं हे देणं
बळीराजासाठी काबाड कष्ट करण
सर्ज्या तुमच्यासाठी रे नैवद्य पुरणाची पोळी
लाडाने भरविते आनंदाने आई माझी
आला आला बैल पोळा
चला साजरा करू थाटामाटात
माझ्या सर्जा राजाचा सन आला
आनंदाने नाचत
