Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rahul Kosare

Others

3  

Rahul Kosare

Others

शेतकरी राजा

शेतकरी राजा

1 min
1.1K


शेतकरी राजा शेतकरी राजा

तुला शेती काय ते कळतंय ना ?

दिवस रात्र काळया मातीमध्ये

पाण्यासारखा घाम तू गाळतोय ना ?


बियाणे टाकून काळया मातीमध्ये

पाऊसाची वाट तू पाहतोय ना ?

निसर्ग अन् देव नाही तुझ्या सोबत 

तुझ्या कष्टाचं पण तो पाहतोय ना ?


अंकुर निघाले काळया मातीमधून

तुला जागल करावं लागतोय ना ?

रात्रीच्या या काळया अंधारामध्ये रानटी डुक्कर 

तुझा पीक खाऊन तुझ्या पिकात तो लोळतोय ना ?


भीती नाही का ? शेतकरी राजा तुला 

दिवस रात्र जागून पीक तू पिकवतोय ना ?

रात्रीच्या या अंधारामध्ये विंचू , साप

अन् वाघ शिवरावर फिरतोय ना ?


काळजी नाही का निसर्गाला शेतकऱ्याची

ऐन कापणीच्या वेळेवर पाऊस पडतोय ना ?

हातात आलेला पीक पाऊस नेतो

ते पाहून शेतकऱ्याच मन रडतोय ना ?


सरकार फिरून सर्वे करुन 25% अनुदान देतो

त्या रकमेने कुठ सावकाराच कर्ज फेडतोय का ?

घरचा खर्च राहिला बाजूला 

मुलांचं तरी शिक्षण पूर्ण होतंय का ?


Rate this content
Log in