STORYMIRROR

Rahul Kosare

Others

4  

Rahul Kosare

Others

वाट पाहतोय मी पावसाची

वाट पाहतोय मी पावसाची

1 min
249

शेतकरी आहे मी राजा 

वाट पाहतोय मी पावसाची

बियाणे पेरून मातीमध्ये

वाट पाहतोय मी सरींची 


ये रे पावसा ये तू लवकर

वाट पाहतोय मी सरींची

नाही बरसला तू जर पावसा

तर बियाणे खराब होईल माझी


शेतकरी आहे मी नावाचा राजा

नाही आहे रे देवा पैसे माझ्याकडं

जगाला पोसतो मी हिरव शेत पिकवून

जरा दे रे देवा वेळ काढून लक्ष माझ्याकडं


कृपा कर रे पावसा तू 

या वर्षी तरी माझ्यावर

खूप पीक येवुदे माझ्या शेतात

अन् योग्य हमीभाव मिळू दे माझ्या पिकाला 

देवा यंदा तरी लक्ष ठेव रे या जगाच्या पोशिंद्यावर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन