STORYMIRROR

# नॉन स्टॉप नोव्हेंबर

SEE WINNERS

Share with friends

प्रस्तावना

 

तुम्हाला स्वतःला लेखनाविषयी आव्हान द्यायचे आहे काय?

हो, तर मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. स्टोरीमिरर सादर करीत आहे नॉनस्टॉप नोव्हेंबर, महिनाभर लिहितं राहण्याचं आव्हान.

ही स्पर्धा नाही तर हे आव्हान आहे, त्यामुळे यातून कोणीही विजेता निवडला जाणार नाही. परंतु तुम्हाला पुस्तके मोफत मिळण्याची संधी मिळू शकेल.

दररोजच्या विषयाची सूची वरील चित्रात दिलेली आहे. आजच्या दिवसासाठीचा विषय पाहा, तुमचा लेखनासाठीचा आवडता पेन हाती घ्या आणि सुरू करा लिखाण.

चला तर मग... तुम्ही कशाची वाट पाहताय? लिहा, लिहा आणि लिहा...  #नॉनस्टॉपनोव्हेंबर

 

नियम

  • स्पर्धकांनी पाठवलेल्या कथा किंवा कवितेचे शीर्षक संबंधित दिवसासाठी दिलेल्या विषयाच्या शीर्षकाशी मिळतेजुळते नसावे.
  • सर्व शीर्षकांची सूची वरील चित्रात दिलेली आहे. तारखेनुसार त्या थीमवर लिहावे अशी आमची सर्व लेखकांस विनंती आहे.
  • सर्व प्रकारच्या कविता आणि कथा स्वीकारण्यात येतील.
  • कथा, कवितांच्या प्रकारांबाबत कोणतेही बंधन नाही.
  • कथा किंवा कविता या स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकद्वारेच सबमिट केली पाहिजे.
  • स्पर्धकांनी त्यांच्या स्वतःच्या कथा, कविता किंवा कोट्स सादर करावेत.
  • स्पर्धक कितीही कथा, कविता आणि कोट्स सबमिट करू शकतो. त्याला संख्येचे बंधन नाही.
  • https://storymirror.com येथे सबमिट आधीच केलेली कविता, कथा किंवा कोट्स पुन्हा सबमिट करू नये.
  • स्टोरी मिररने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.
  • लेख किंवा निबंध सबमिट करता येणार नाहीत.

 

बक्षीसे

  • या स्पर्धेत दहा दिवस आणि दहा वेगवेगळ्या विषयांवर कथा किंवा कविता सबमिट करणाऱ्या लेखकांना स्टोरीमिररकडून मोफत पुस्तक दिले जाईल.
  • 30 विषयांवर तारखेनुसार कोट्स सबमिट करणाऱ्या लेखकांना स्टोरीमिररकडून एक पुस्तक मोफत दिले जाईल.
  • तुम्ही तीस दिवस दररोज कविता किंवा कथा सादर केल्यास तुम्हाला स्टोरीमिरर ट्रॉफी देण्यात येईल.
  • तुम्हाला तारखेनुसार दिल्या गेलेल्या थीमवर आधारीत लेखन करावे लागेल, याची कृपया नोंद घ्यावी.
  • दहा वेगळ्या विषयांवर एकाच दिवशी दहा कथा किंवा कविता सबमिट केल्यास ते बक्षीसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
  • तसेच एकाच विषयावर दहा दिवस दररोज वेगवेगळ्या कथा सबमिट केल्यास ते बक्षीसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
  • सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

पात्रता

नॉनस्टॉप नोव्हेंबर या स्पर्धेसाठीचा कालावधी 1 नोव्हेंबर 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 हा असेल.

मोफत पुस्तकासाठी यशस्वी ठरलेल्या सहभागींची यादी 20 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

 

कंटेन्ट टाईप – कथा/ कविता/ कोट्स

 

संपर्क – marketing@storymirror.com/ 022-49240082 / 022-49243888


Trending content