Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Niranjan Niranjan

Others

3  

Niranjan Niranjan

Others

मोठ्या मनाचा माणूस - भाग तीन

मोठ्या मनाचा माणूस - भाग तीन

14 mins
533


भाग ८

सुट्टी संपून शाळा परत सुरु झाली. इतके दिवस मुलांशिवाय रिकामा पडलेला, भकास वाटणारा शाळेचा आवार मुलांच्या कलकलाटाने पुन्हा एकदा भरून गेला. पानझड झालेल्या वृक्षाला नवी पालवी फुटावी तशी शाळा चिरतरुण दिसू लागली. सहावी ब च्या वर्गात मुलं एक एक करून येत होती. काही मुलांचे चेहरे मरगळलेले होते. तर काहींच्या चेहऱ्यावर उत्साह साफ दिसत होता. राजू आणि प्रमोद नेहमीप्रमाणे पहिल्या बेंचवर बसले होते. बबन सुद्धा त्याच्या चांडाळ चौकडी बरोबर आत आला. त्याच्या कपाळावर कूंकू होतं तर केसात तांदळाचे दाणे दिसत होते. आज बबनचा वाढदिवस होता. त्याच्या आईने सकाळीच त्याला ओवाळलं होतं. बबनने जाड भिंगाचा चष्मा घातलेल्या एका मुलाच्या गालाचा चिमटा काढला आणि हळूच मागे निघून गेला. त्याच्या मागची चांडाळ चौकडी त्या मुलाकडे बघून हसली आणि मागच्या बेंचवर जाऊन बसली. तो ढापण्या मुलगा कळवळला. चिमटा बबननेच काढला आहे हे त्याला कळलं. पण तो काहीच बोलू शकला नाही. आज बबनने लाल रांगाचा झगमगीत शर्ट घातला होता. त्याच्या वडिलांनी तो खास त्याच्या वाढदिवसासाठी आणला होता. शाळा सुटल्यावर बबनने बसची वाट पाहत असलेल्या प्रमोदला हाक मारली. प्रमोद बबानपाशी आला आणि त्याने बबनला विचारले, “काय रे बबन आज नविन शर्ट? आज काय वाढदिवस आहे का तुझा?” बबन त्याला म्हणाला, “अरे म्हणून तर तुला हाक मारली. आज माझ्या घरी पार्टी आहे. तेव्हा तुझ्या त्या हुशार मित्राला काय बरं नाव त्याचं? हा, राजूला पण नक्की आण. बर जातो मी.” एवढे बोलून तो समोरच उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन बसला.

प्रमोदची बसही थोड्या वेळाने आली. प्रमोदने ठरवलं आज काहीही करून राजूला बबनच्या पार्टीला न्यायचं. बबन काही वाईट मुलगा नाही. तो फक्त अभ्यास करत नाही एवढचं.

नविन शर्ट आणि त्याच्या आत्यानी गिफ्ट दिलेली जीन्स घालून प्रमोद राजूच्या झोपडीच्या दिशेने निघाला. माझ्याकडे नवीन कपडे नाहीत हे कारण राजू सांगणार हे प्रमोदला माहित होतं म्हणूनच त्याने राजूसाठीही त्याचा एक चांगला शर्ट आणि जीन्स बरोबर घेतली होती. तो आज काहीही करून राजूला बरोबर नेणार होता. प्रमोद राजूच्या झोपडीपाशी आला आणि त्याने राजूला हाक मारली तशी रखमा बाहेर आली आणि तिने प्रमोदला विचारलं, “काय र प्रमोद काय झालं?” तेव्हा प्रमोद म्हणाला, “काही झालं नाही हो काकू. आमच्या एका मित्राचा आज वाढदिवस आहे. त्याने आम्हाला पार्टीसाठी त्याच्या घरी बोलावलं आहे. त्यासाठी मी राजूला घेऊन जायला आलो आहे.”

“तू ये ना आत. मी छानपैकी चा करते. चा प्या अन तुमी जा.” प्रमोद आत गेला आणि त्याने राजूला बबनच्या पार्टीबद्दल सांगितलं. राजू म्हणाला, “अरे तू जा मी नाही येत. असही माझ्याकडे घालायला चांगले कपडे नाहीत.” लगेच प्रमोद उत्साहात म्हणाला, “मित्रा मला माहित होतं तू हेच कारण देणार. म्हणूनच मी तुझ्यासाठी माझे शर्ट आणि जीन्स आणले आहेत. ते घाल आणि गपगुमान चाल.” राजूचा नाईलाज झाला आणि त्याने प्रमोदने आणलेले कपडे घातले. दोघांनीही चहा घेतला आणि ते निघाले. थोडा वेळ चालल्यावर त्यांना रिक्षा मिळाली आणि ते रिक्षाने बबनच्या घरापाशी आले. खरतर बबनचं घर एखाद्या महालापेक्षा कमी नव्हतं. समोर भव्य प्रवेशद्वार होतं. प्रवेशद्वारातून आत जाताच मधोमधच सिमेंटचा रस्ता होता व त्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी बाग होती. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना असलेल्या दिव्यांच्या प्रकाशात रात्रीदेखील बागेतील झाडांचा व गवताचा हिरवा रंग चमकत होता. बंगल्याच्या बाहेरच्या दगडी भिंतींवरील कोरीव काम अतिशय सुंदर होतं. समोरच बबन रोज ज्या गाडीने येत असे ती मर्सीडीज दारात उभी होती. प्रमोद आणि राजू आत आले. सगळीकडे मोठी झुंबर लटकत होती आणि त्यांच्या प्रकाशाने तो संपूर्ण हॉल उजळून निघाला होता. एका बाजूला डॉलबी स्पीकर ठेवले होते. मोठ्या आवाजात गाणी लागली होती. त्या गाण्यांच्या तालावर सगळी मुलं नाचत होती. बबनही त्यांच्यात नाचत होता. राजू आणि प्रमोद एका कोपऱ्यात उभे होते. थोड्यावेळाने बबनचं लक्ष प्रमोद आणि राजूकडे गेलं. तसा तो नाचायचा थांबला आमण प्रमोदपाशी आला. त्याने प्रमोदचा हात पकडला आणि त्याला ओढतच आत मध्ये नेलं. प्रमोदही जमेल तसा नाचू लागला. राजू मात्र अजूनही त्या कोपऱ्यातच उभा होता. प्रमोदने राजूला नाचायसाठी बोलावलं पण तो गेला नाही. तो आजूबाजूला पाहत होता. त्या भव्य हॉलच्या भिंतींवर अडकवलेली महागडी पेंटीग्ज, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उंच लाकडापासून बनवलेल्या पायऱ्या आणि त्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूांना ठेवलेली वेगवेगळ्या आकाराची शिल्पे, मूर्ती त्यांचे लक्ष वेधून घेत होती. हा सगळा डोळे दिपवणारा झगमगाट आणि थाटमाट तो पहिल्यांदाच पहात होता.

थोड्या वेळाने आतल्या खोलीतून शेरवानी घातलेले भव्य शरीरयष्टीचे एक गृहस्थ आणि त्यांच्यापाठोपाठ एक स्त्री हॉलमध्ये आले. ते दोघे बबनचे आईवडील होते. बबनच्या बाबांनी मिशी आणि लांब दाढी ठेवली होती. त्यांच्या हातात सोन्याचं मोठ कडं होत व गळ्यात सोन्याचीच साखळी होती. त्याचां व्यक्तिमत्व भारदस्त होतं. बबनची आई मात्र बबनच्या बाबांपुढे थोडी वयस्कर वाटत होती. तिने तरूण दिसण्यासाठी भरपूर मेकअप केला होता. पण तरीही ती वयस्कर वाटत होती. तिने काळ्या रांगाची साडी नेसली होती. साडीच्या कडावर सोन्याची जर होती. पण तिचा चेहरा मात्र आनंदी होता. तिने गाणे चालू असलेल्या सीडी प्लेयरचं बटण बंद केलं. सगळी मुलं नाचायची थांबली आणि काय झालं म्हणून इकडे तिकडे बघू लागली. तेव्हा बबनची आई म्हणाली, “मुलांनो जेवण तयार आहे. आधी गरम गरम जेऊन घ्या. आणि मग काय घालायचा तो गोंधळ घाला. चला बसा पटापट खाली.” मुलं खालीच जेवायला बसली. आतून दोन-तीन नोकर येऊन पटापट वाढू लागले. जेवणं झाली. बबन प्रमोद आणि राजूला त्याच्या वडिलांपाशी घेऊन आला. त्याने राजूकडे बोट केलं आणि तो त्याच्या बाबांना म्हणाला, “बाबा, हा राजू. हा आमच्या शाळेतला सर्वात हुशार मुलगा. हा शाळेत कायम पहिला येतो.” बबनच्या बाबांनी राजूकडे कौतुकाने पाहिलं आणि ते म्हणाले, “अरे वा फारच छान. जरा आमच्या पोराला पण शिकव अभ्यास. जरा बी अभ्यास करत नाही आमचा बबन. बघावं तेव्हा इकडे तिकडे फिरत असतो.” तसा बबन ओशाळला आणि म्हणाला, “काय हो बाबा, तुम्ही सारखां अभ्यास अभ्यास करता. आज माझ्या वाढदिवशी तरी जरा मजा करू द्या.” “कर बाबा मजा कर” बबनचे बाबा त्याला म्हणाले. राजू आणि प्रमोद परत हॉलमध्ये आले. बबनही बाहेर आला आणि त्याने परत गाणी सुरु केली. पण नुकतीच जेवलेली मुलं जागची हलेनात. जेवण अतिशय रुचकर झाल होतं. त्यामुळेच सगळे सुस्तावले होते. बबन एकेकाला नाचण्यासाठी उठवत होता. प्रमोदही आता कांटाळला होता. राजूच्या मनात वेगळेच विचार चालले होते. फाटक्या साडीतल्या त्याच्या आईबद्दल तो विचार करत होता. थोड्याच दिवसात त्याच्या आईचा वाढदिवस होता. कितीतरी महिने झाले रखामाने नवीन साडी घेतली नव्हती. काहीही करून आईला या वाढदिवसाला नविन साडी घ्यायची असं राजूने ठररवलं. पण कशी घेणार साडी, पैसे कुठून आणायचे? राजू विचार करू लागला. गावात राजू पहिला आला म्हणून त्याला सरांनी शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले होते. पण शंभर रुपयात साडी कशी घेणार? तसे जर त्याने प्रमोदला किंवा बबनला मागितले असते तर लगेच त्यानी त्याला पैसे दिले असते. पण राजूला असं कुणाकडे पैसे मागण्यात कमीपणा वाटायचा. त्याचा स्वभाव मानी होता. त्याच्या डोक्यात एक विचार आला. दुसऱ्याच दिवशी शाळेत गेल्यावर त्याने तो विचार प्रमोदला बोलून दाखवला. प्रमोद त्याला म्हणाला, “खरतर मी आत्तापण तुला पैसे देऊ शकतो. पण तू घेणार नाहीस हे मला माहित आहे. तुझ्यामुळे जर बबन अभ्यासाला लागला तर चांगलच आहे.”

संध्याकाळी प्रमोद बबनच्या घरी गेला. सुदैवानं बबन घरी नव्हता. त्याने सेक्युरीटी गार्डला काकांना भेटायचां आहे असं सांगितलं. गार्डने आत फोन केला व राजूचं नाव सांगितल. फोन ठेवला आणि गार्डने राजूला आत सोडले. राजू आत आला बबनचे बाबा हॉलमध्येच टीव्ही बघत बसले होते. राजूला पहाताच ते म्हणाले, “अरे राजू बबन घरी नाही आहे. माझ्याकडे काय काम काढलस?” “काका मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काल तुम्ही म्हणालात बबनला जरा अभ्यास करायला शिकव. त्यावर मी काल विचार केला आणि बबनची हरकत नसेल तर सुट्टीच्या दिवशी मी बबनची शिकवणी घेत जाईल. तुम्हाला जर वाटलच तर मला पैसे द्या.” बबनचे बाबा राजूकडे पाहून हसले. त्यांना राजूच फार कौतुक वाटलं.

किती प्रगल्भ विचार होते राजूचे. पण ही प्रगल्भता परिस्थितीमुळे आली होती. ते म्हणाले, “पोरा खरंतर मला तुझं कौतुक वाटतं. माझं पोरगं पण तुझ्याच वयाचं आहे. पण तो तुझ्यासारखा समजूतदार कधी होणार देवच जाणे. तू ये पुढच्या आठवड्यापासून शिकवणीसाठी. बबन काय सहजासहजी तयार नाही होणार पण त्याला मी तयार करेन.” राजू तिथून निघून गेला.

रात्री बबन घरी आला. बाबांनी त्याला आत बोलावलं. ते बबनला म्हणाले, “बबन, तुला कॉम्प्युटर हवा होता ना?” कॉम्प्युटरचे नाव ऐकताच बबन खुश झाला होता व बबनने मान डोलावली. “पण जर तुला कॉम्प्युटर हवा असेल तर माझं ऐकायला लागेल”. “काय?” बबनने विचारलं. “मी तुमच्या वर्गातल्या राजूला दर रविवारी तुझी शिकवणी घ्यायला सांगितलं आहे. तेव्हा तो पुढच्या आठवड्यात रविवार पासून घरी येऊन तुझी शिकवणी घेईल. जर तू त्याने सांगितल्या प्रमाणे अभ्यास केलास तरच तुला मी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटर घेऊन देईन.” जर घरी कॉम्प्युटर आला तर बबनला गेम खेळण्यासाठी सारखं कॅफेत जावं लागणार नव्हतं. त्याने थोडा वेळ विचार केला व तो वडीलांना म्हणाला, ” “मी तयार आहे पण तुम्ही मला आधी कॉम्प्युटर घेऊन द्या.” बबनच्या बाबांना तो एवढ्या लवकर तयार होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी बबनसाठी नवा कॉम्प्युटर खरेदी केला. पण बबनचा प्लॅन वेगळाच होता. खरंतर हा प्रमोदचा प्लॅन होता. त्या दोघांनी मिळून ठरवलं होतं. काहीही करून राजूला बिघडवायचं म्हणजे त्याचं अभ्यासातलं लक्ष उडेल व प्रमोदला शाळेत पहिलं येण्याची संधी मिळेल.

रविवारी राजू ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर बबनच्या घरी आला. बबन अजूनही झोपला होता. त्याच्या आईने त्याला उठवलं व राजू आल्याचं सांगितलं. बबन उठून आवरायला लागला. थोड्याच वेळात बबन व राजू बबनच्या खोलीत गेले. बबनचा कॉम्प्युटर ही तिथेच ठेवला होता. त्यात बबनने बऱ्याच गेम्स टाकल्या होत्या. राजूने दप्तरातून मराठीचं पुस्तक काढलं व तो बबनला म्हणाला , “बबन आता मी पहिला धडा वाचेन, तू लक्ष देऊन ऐक. आणि मग तू तोच धडा वाच. मग मी तुला प्रश्न विचारीन त्या प्रश्नांची उत्तर तू द्यायचीस.” बबन त्याला म्हणाला, “अरे आत्ता माझा मूड नाहीये. मी थोडा वेळ गेम खेळतो मग तू वाच.” राजू त्याला म्हणाला, “ठीक आहे पण थोडाच वेळ.” राजूचे शब्द बबनच्या कानापर्यंत पोहोचायच्या आत त्याने कॉम्पुटर चालू केला सुद्धा. तो रोडरॅश गेम खेळायला लागला. गेममध्ये मोटारसायकलची रेस चालू होती. बबनच्या खेळावरुन त्याला चांगलीच प्रॅक्टीस आहे असं दिसत होत. राजू सुद्धा पाहत होता. तो पहिल्यांदाच कॉम्प्युटर गेम पाहत होता. बबनने पहिली रेस अगदी सहज जिंकली, आता दुसरी रेस चालू झाली. बबन अगदी सराईतासारखा गाडी चालवत होता. राजूला पण गेम खेळावी वाटत होती. बघता बघता अर्धा तास झाला होता. आपण इथे कशासाठी आलो आहोत हे विसरून राजूही गेममध्ये बुडून गेला होता. अचानक त्याच लक्ष घड्याळाकडे गेलं आणि तो भानावर आला. राजू बबनला म्हणाला, “बबन आता खूप वेळ झाला आता आपण शिकवणी सुरु करूयात.” बबनने कॉम्प्युटर बंद केला आणि राजूने पहिला धडा वाचायला सुरुवात केली. बबनला नीट समजलं पाहिजे म्हणून तो मुद्दाम हळूहळू वाचत होता. राजूचा धडा वाचून झाला. त्याने बबनकडे पाहिले तर तो खुर्चीत गाढ झोपला होता. राजूने बबनचा खांदा पकडून त्याला हलवला पण बबन गाढ झोपला होता. नाईलाजाने राजूने पुस्तक दप्तरात ठेवलं आणि तो तिथून निघाला. बबनला शिकवणी व अभ्यासाची सवय लागणं हे काही वाटत तितकं सोप नाही हे राजूला आता कळल होतं.

घरी आल्यावर राजूला पण गाढ झोप आली व झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तो त्या गेममधल्या गाड्यांसारख्याच एका गाडीवर बसून जात होता. रेस मधल्या इतर गाड्यांना त्याने मागे टाकले आणि शेवटी तो रेस जिंकला. तो गाडीवरुन उतरला. समोर त्याची आई नवीकोरी साडी घालून उभी होती. त्याने हेल्मेट काढून गाडीच्या हॅण्डलला लावले व पुढे होऊन आईच्या पायाला हात लावला. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशिर्वाद दिला.

इतक्यात त्याला जाग आली. रखामाने त्याला उठवलं होतं. ती राजूला म्हणाली, “अर पोरा किती येळ झोपलावतास. चल मी तुझ्यासाठी चा केलाय तो चा पेऊन घे पटकन.”

राजूने घडाळ्यात पाहिले तो तब्बल चार तास झोपला होता. राजूने चहा प्यायला व तो अभ्यासाला बसला.

आता राजू आणि बबन मध्ये चांगलीच मैत्री झाली होती. बबनची आई राजूला बऱ्याच वेळा सकाळी नाष्ट्याला बोलवायची. तिथे त्याला यापूर्वी कधी न खाल्लेले वेगवेगळे पदार्थ खायला मिळायचे.

बघता बघता परत रविवार उजाडला. राजू सकाळी लवकर आवरुन बबनच्या घरी पोहोचला नेहमी प्रमाणेच बबन आताही अजून झोपला होता. बबनच्या आईने त्याला उठवलं व तो थोड्यावेळात आवरुन बाहेर हॉलमध्ये आला. दोघेही बबनच्या रुममध्ये गेले. राजू बबनला म्हणाला, “मागच्यावेळी प्रमाणे या वेळी झोपायच नाही आणि जो पर्यंत तू प्रश्नांची उत्तर बरोबर देत नाहीस तो पर्यंत मी तुला गेम पण खेळू देणार नाही. मी जरी तुझा मित्र असलो तरी आता मी तुझा शिक्षक आहे त्यामुळे तू माझं ऐकलच पाहिजेस.” आश्चर्य म्हणजे बबनही लगेच तयार झाला. राजूने पहिला धडा परत वाचून दाखवला. बबनने ही तो एकदा वाचला. राजूने धड्यामागे दिलेले काही प्रश्न बबनला विचारले. बबनने एक दोन प्रश्नांची अचूक उत्तर दिली. राजूसाठी हे सर्व खरचं अविश्वसनीय होतं. आजची शिकवणी संपली होती. राजूने दप्तर भरलं व तो तिथून निघणार तेवढ्यात बबन त्याला म्हणाला, “अरे एवढ्यात कुठे निघालास? तू गेम खेळणार नाहीस का?” राजू त्याला म्हणाला, “अरे नको, मला नाही आवडत गेम वगैरे. मी जातो. घरात काम पण आहे.” “खेळून तर बघ तुलापण आवडेल. मी आज तुझं एवढं ऐकलं. माझं ऐकणार नाहीस का? असही मला एकटयाला गेम खेळायला कंटाळा येतो.” बबन म्हणाला. राजूची इच्छा तर नव्हती पण तरीपण तो थांबला. बबन आज खरच शहाण्या मुलासारखा वागला होता.

बबनने गेम चालू केला. कुठली बटणं दाबायची ते राजूला सांगितल. राजू गेम खेळायला लागला. सुरुवातीला त्याची गाडी सारखी आदळत होती. पण थोड्यावेळ खेळल्यावर त्याला चांगलं जमायला लागलं. बऱ्याच वेळानांतर तो एक रेस जिंकला. त्याला तो गेम फारच आवडला होता. तो सलग एक तास गेम खेळला होता. शेवटी बबनच त्याला म्हणाला, “बघ आख्खा एक तास तू गेम खेळलास आणि म्हणे मला गेम वगैरे काही आवडत नाही.” राजू नुसता हसला आणि दप्तर घेऊन तेथून निघाला. सायकल चालवतानाही आपण आता गाडीच चालवत आहोत असं राजूला वाटलं. आपण दर रविवारी बबनकडे शिकवणीला जातो हे राजूने आईला सांगितलं नव्हतं. तिने विचारलं तर तो फक्त मित्राकडे जातो आहे एवढचं सांगायचा. त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं.

आता बबन खरच अभ्यासाला लागला होता. एरवी मित्रांना बरोबर घेऊन बाहेर टवाळक्या करणाऱ्या बबनला पुस्तकात डोक खुपसून बसलेलं पाहून बबनच्या बाबांनाही बरं वाटलं. हा सगळा राजूच्या संगतीचा परिणाम आहे हे त्यांना समजलं होतं.

या रविवारी राजू नेहमीप्रमाणे सकाळी लवकर बबनच्या घरी गेला. त्याला बबनच्या वडिलांनी आत बोलावलं व ते त्याला म्हणाले, “राजू तुझी शिकवणी सुरु झाल्यापासून बबन पूर्णपणे बदललाय. तुझ्या संगतीत राहून तो पण आता अभ्यासाला लागलाय. माझ्याकडून तुला हे छोटसं बक्षीस.” असं म्हणून बबनच्या बाबांनी राजूच्या हातात एक पाकीट दिलं. तेवढ्यात बबन तिथे आला आणि ते दोघं बबनच्या खोलीत आले. आज राजू बबनला गणित शिकवत होता. बबनही पूर्ण लक्ष देउन तो जे सांगेल ते ऐकत होता. त्याच्यात आमुलाग्र बदल झाला होता.

शिकवणी संपली. बबन राजूला म्हणाला, “राजू मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे.” बबनचा चेहरा गंभीर झाला होता. “खरतर मला तुझी माफी मागायची आहे.” “अरे पण तू असं काय केलसं?” काही न समजल्यामुळे राजू म्हणाला. “सांगतो सगळं सांगतो. काही दिवसांपूर्वी जेव्हा परीक्षेचा रिझल्ट लागला व तू पहिला आलास त्याच दिवशी रात्री प्रमोद माझ्या घरी आला. तो खूप चिडला होता. तू शाळेत पहिला आल्यामुळे त्याला तुझा राग आला होता. प्रमोद आमच्या सर्व मित्रांमध्ये सर्वात हुशार मुलगा होता. पण तू आल्यापासून आपल्यापेक्षाही कोणीतरी हुशार आहे हे त्याला सहन झालं नाही. मग त्या रात्री आम्ही एक प्लॅन बनवला. तुला बिघडवायचा. तुला माझ्या वाढदिवशी पार्टीला बोलावणं हा त्या प्लानचाच भाग होता. खरतर मलाही आधी अभ्यासू मुलांचा फार राग यायचा. बघेल तेव्हा ही मुलं पुस्तकात दंग असतात हे बघून मला त्यांची कीव यायची. पण जेव्हा तू माझ्या घरी शिकवणी साठी आलास त्या दिवशी मी विचार केला की तुझ्यासारख्या मुलांना जगण्यासाठी किती धडपडायला लागतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तू अभ्यास करून शाळेत पहिला आलास याचं मला फार कौतुक वाटलं. तू मला शिकवतांनाही किती मनापासून शिकवलस हे ही मला समजलं आणि तुझ्यासारख्याला बिघडवण्याच्या विचारानेच मला शिसारी आली. मला प्लीज माफ कर आणि मित्र म्हणून एक सल्ला देतो, प्रमोद खूप आतल्या गाठीचा मुलगा आहे. त्याच्या नादाला लागू नकोस.”

राजूसाठी हा फार मोठा धक्का होता. ज्याला तो सर्वात जवळचा मित्र मानत होता तोच त्याचा शत्रू होता. राजूचं डोकं सुन्न झालं होतं. काय बोलावं हेच त्याला कळेना. तो सरळ तिथून निघून घरी आला. खरंतर बबनकडून त्याला फारशी आशा अपेक्षा नव्हती. तो एवढ्या लवकर सुधारेल असं त्याला वाटलं नव्हतं. बबनला ओळखायला तो पूर्णपणे चुकला नव्हता. प्रमोद मात्र त्याच्या मनातून पूर्ण उतरला होता. इथून पुढे आता आपलं लक्ष फक्त अभ्यासाकडे द्यायचं ठरवलं आणि त्याने पुस्तक काढायला दप्तरात हात घातला. त्याच्या हाताला बबनच्या वडीलांनी दिलेलं पाकीट लागलं. त्याने पाकीट उघडलं. त्यात शंभर रुपयांच्या दोन नोटा होत्या. आता त्याच्याकडे एकूण तीनशे रुपये होते. तो आता एखादी चांगली साडी त्याच्या आईसाठी घेणार होता. पुढच्याच आठवड्यात रखमाचा वाढदिवस होता.

आज नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला. प्रमोदशी एक शब्द देखील बोलायचा नाही अस त्याने ठरवलं होतं. प्रमोद राजूच्या शेजारी येऊन बसला. राजू आणि प्रमोद शाळेत आल्यावर रोज आदल्या दिवशीच्या होमवर्कबद्दल चर्चा करायचे. राजू मात्र आज काहीच बोलला नाही. त्याने प्रमोदकडे पाहिलेसुद्धा नाही. थोड्या वेळाने प्रमोदनेच विचारले, “काय राजू, काल सरांनी दिलेली सगळी गणितं जमली का तुला?” राजू काहीच बोलला नाही. ऐकून पण न ऐकल्यासारखं करत होता. प्रमोद पुन्हा म्हणाला, “लक्ष कुठे आहे राजू तुझं? मी काय विचारलं?” राजूने प्रमोदकडे बघितलं. पहिल्यांदाच प्रमोदला राजूच्या चेहऱ्यावर राग दिसला. राजू बोलला, “जाऊ दे ना काय फरक पडतो आता.” आज राजूचं काहीतरी बिनसलं आहे हे प्रमोदला कळलं. पण काय? तो विचार करू लागला. पण त्याला काही सुचेना म्हणून त्याने तो विचार सोडून दिला. पुढच्या दिवसापासून राजू मागच्या बेंचवर बबनच्या बाजूच्या बेंचवर बसायला लागला. राजू आपल्यावर नाराज आहे हे प्रमोदला समजलं होतं. बबनने त्याला सगळं सांगितल होतं. आपला प्लान फसल्यामुळे तो बबनवर चिडला होता. पण आपण आपल्याच मित्राला फसवायला निघालो होतो याचा त्याला काडीचाही पश्चाताप झाला नव्हता.

शाळा सुटल्यावर राजू आणि बबन एका साडीच्या दुकानात आले. बबनची आई त्याच दुकानातून साड्या घेत असे. राजूने एक हिरव्या रंगाची साडी घेतली. त्यावर रंगीत डिझाईन देखील होते. कधी एकदा आपण घरी जातो आणि आईला ही साडी देतो असे त्याला झाले होते. आईचा आनांदी झालेला चेहरा त्याला पाहायचा होता. राजू घरी पोहोचला. आपल्या पहिल्या कमाईतून आणलेली साडी आईला देण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. पण वाढदिवसाचा दिवस उजाडायला अजून आवकाश होता. ती रात्र त्याने कशीबशी घालवली. सकाळी लवकर उठून आंघोळ करून त्याने आईच्या पाया पडल्या आणि ज्या दप्तरात काही रविवारापूर्वी रखमाने नवाकोरा शर्ट आपल्या रखरखीत हातांनी हळूच ठेवला होता. त्याच दप्तरातून राजूने नवीकोरी साडी काढली आणि आईच्या हातात ठेवली. आणि तो रखमेला म्हणाला, “तुझा वाढदिवस मी विसरलेलो नाही, आई.” साडी पाहून रखमेच्या चेहऱ्यावर उमटलेले अविस्मरणीय भाव पाहण्यासाठीच राजूने इतके दिवस एवढी खटपट केली होती. रखमाच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. तिने राजूला जवळ घेतले.

आणि ती त्याच्या डोक्यावरुन हात फिरवू लागली. ती काहीच नाही बोलली. काही बोलायची गरजच नव्हती. आई मुलातलं नातचं तितकं घट्ट होतं.

अजूनही राजू दर रविवारी बबनच्या घरी शिकवणीसाठी जात होता. बबनही नियमितपणे अभ्यास करत होता. आता परीक्षा जवळ आली होती. आठवडाभर अभ्यास करून ज्या ज्या शंका बबनला यायच्या त्या तो रविवारी राजूला विचारायचा. यावेळी पहिल्यांदाच बबनने मन लावून परीक्षा दिली होती. यावेळी आपल्याला चांगले मार्क मिळतील याची त्याला खात्री वाटत होती. परीक्षा संपली आणि निकाल आला. यावेळी देखील राजू पहिला आला होता. नेहमी काठावर पास होणाऱ्या बबनला देखील ६५ टकके् गुण मिळाले होते. त्याला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. राजूचे आभार कसे मानावेत हेच त्याला कळत नव्हतं. केवळ राजूमुळेच त्याला अभ्यासाची सवय लागली होती.


क्रमशः


Rate this content
Log in