Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others

4  

Suresh Kulkarni

Others

तात्या सोमण !

तात्या सोमण !

7 mins
17.2K


माझ्या खांद्यावर बसून एक कावळा टोच्या मारतोय असे मला वाटले म्हणून मी मागे वळून पहिले. तो मागे तात्या सोमण ! पाठमोऱ्या माणसाला हाक मारण्या ऐवजी, तात्या त्याचा खांद्यावरआपल्या मधल्या बोटाने टकटक करतो, हि त्याची सवय पुढे अंगवळणी पडली . मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्या कडे पहिले .

" या इथे एक बोकूड दाढीचा रिक्षेवाला उभा असतो. आज तुम्ही त्याला पाहिलंत का ?"

"नाय ! काही काम होत का त्याचा कडे ?"

"नसत्या चौकश्या कशाला करताय ? पाहिलंत का नाही ,येव्हडच सांगा !"

हे पाणी काही आपल्या नगरच नाही याची मी मनात नोंद घेतली. तेवढ्यात नरसू रिक्षेवाला आलाच .

"बर झालं . तुमचीच चौकशी करत होतो. पण हा बाबा काय सांगत नव्हता !" माझ्या कडे हात करून तो म्हणाला .

"अहो, ते कुळकर्णी सायेब हैत . "

"कोण का असेनात . काल तुमच्या कडे एक रुपया राहिला होता, सुटे नव्हते ना. तुम्ही उद्या देतो म्हणाला होतात . आता द्या !"

मी आणि नरसू दोघेहि चक्रावलो . एका रुपया साठी हा गृहस्थ घरापासून रिक्षा स्टॅन्ड पर्यंत आला होता !

"आज पण माझ्या कडे सुटे नाहीत !" नरसूने डिक्लीयर केले . तसा तो भडकला.

"असे कसे नाहीत ? माझे मला पैसे देऊन टाका ! सुट्याच तुमचे तुम्ही बघा ! "

शेवटी मलाच बघवले नाही . मी खिशातला रुपया नरसूला देऊन तो वाद मिटवला.

मग तात्या नेहमी दिसू लागला . जात येता ओळखीचे हसू लागला . एक दोनदा आम्ही सोबत चहा पण घेतला . माझा मुळे शाम्याची पण ओळख झाली आणि बघता बघता तो आमच्या ग्रुपचा झाला . मुडक्याच्या टपरीला एक गिऱ्हाईक वाढलं . त्याच्या बोलण्यातून तो कोकणातल्या एका आडवळणाच्या खेड्यातून आला होता आणि त्याचे नाव तात्या सोमण आहे इतकेच कळेल . तो स्वतः बद्दल फारसा बोलायचा नाही . बरेचदा तो ते बोलणे टाळायचा . घरदार ,बायका पोर , भाऊ बहीण काहीच बोलला नाही. बाकी इतर बाबतीत मोकळा होता . थट्टा मस्करीशी वावडे नव्हते ,पण स्वतः करायचा नाही . थोडासा एक्कलकोंडा वाटला . म्हटलं रुळेल हळूहळू. पण आजवर त्याच्यात फारसा फरक पडलेला नाही . तात्याने कोकणातून माडाची उंची आणि हापूस आंब्याचा रंग आणला होता . त्याचा चेहऱ्यात आणि हापूस आंब्यात कमालीचे साम्य होते . त्याची हनुवटी डिट्टो आंब्याच्या कोई सारखी होती !

मी मुडक्याच्या टपरीवर चहा घेत होतो . तेव्हड्यात शाम्या आला .

"चाहा ?"

" प्रश्नच नाही ,अन सोबत खारी पण "

" मग ठीक , मी फक्त चहा घेतलाय ,तुझ्या बीला सोबत त्याचे पण पैसे देऊन टाक !"

" म्हणजे ?"

"म्हणजे , नन्तर येणाऱ्याने सगळे बिल द्यायचे !"

शाम्या गरम चहात खारी बुडून खाण्यात मग्न होता . समोरून तात्या आला .

" चाहा घेणार का सोमण्या ?" मी विचारले

" नको ."

" अरे वा , बरे झाले आमचे एका चहाचे पैसे वाचले .! " शाम्या बरळला

" मग मी पण चहा घेणार !" तात्याने पैंतरा बदलला .

"असे असेल तर आमचे चार चाहा अन पाच रुप्याच्या खारीचा पैसे वाचले . !"

" कस काय ?"तात्या बुचकळ्यात पडला .

" त्याच काय सोमण्या , मी न एक चहा अन पाच रुपयाची खारी खाल्लीय . मी अजून एक चहा घेणार आहे . मायला ,पहिला चहा खारीच पिऊन गेली ! मी आलो तेव्हा सुरश्या ने चहा घेतला होता . तो म्हणाला शेवटी येणाऱ्याने सगळ्याचे बिल द्यायचे . आता पर्यंत मी शेवटी येणार होतो , आता तू आलास तर तूच सगळ्यांचे बिल देणार ना ? आणि समाज आता वश्या आला तर तो देईल . पण वश्या कसा येणार तो गेलाय मुंबईला ! तेव्हा .... घ्या घ्या चहा घ्या ! "

" मेल्यानु ,नेहमी तुम्ही मलाच खर्च्यात घालता ! रावळनाथ तुम्हास बघून घेईल ! " तात्याने नाराजीचा सूर लावला .

"सोमण्या कसला चिडतोयस रे ? इतका अतिरेकी चिक्कू पणा का करतोस रे ? कधी तरी पैसे खर्च करत जा ."मी म्हणालो .

" तुला नाही कळायचं !," तात्या तुटक पणे बोलला . शेवटी मीच बिल दिले .

मी गनीच्या पान पट्टीवर सिगरेट घेत होतो . तेव्हड्यात तात्याने त्याच्या स्टाईल मध्ये खांद्यावर टकटक केली .

"सोमण्या ,सिगरेट घेणार का ?"

"तसा मी बिडी -काडी घेत नाही .तू आग्रह करणार अशील तर, अन तू पाजणार अशील तर घेईन बापुडा!

पण चाहा नंतर !" म्हणजे तात्याला सिगरेट सोबत चहा पण हवा होता !

आम्ही सिगरेट घेऊन मुडक्याच्या टपरी कडे वळलो . टपरीच्या मागच्या बाजूला एक डुगडुगत बाकडं अन काळ्या भोर कडप्याचा टॉप असलेलं पोलिओग्रस्त टेबल आमच्यासाठी कायम 'रिझर्व्ह ' असायचं . तेथ बसल्यावर, तात्याने मघाशी सुतार पेन्सिलचा तुकडा कानावर ठेवतात, तशी ठेवलेली सिगरेट अलगद काढून हलक्या हाताने समोर टेबलवर ,मौल्यवान काचेची वस्तू ठेवावी तशी ठेवली . एखाद भुकेलं कुत्र हडकाच्या तुकड्याकडे जितक्या नजरेनं पहात तितक्या विविध नजरेने --- मायेन ,अधाशीपणान , खाऊ का गिळू नजरेनं , लबाडीन, हावरट पण --तात्या ती सिगरेट न्याहाळत होतो . तेव्हड्यात चहा आला . सिग्रेटवरची नजर न हटवता तात्याने चहा संपवला . ती सिगरेट आडवी धरून या टोकापासून ते त्या टोकापर्यंत तिचा वास घेतला आणि मग एकदाची ती पेटवून ओठात धरली ! ती पूर्ण म्हणजे फिल्टर पर्यंत ओढली ! ती ओढतातना हि प्रथम तर्जनी व मध्यमा बोटात धरून सुरवात केली , नन्तर तर्जनी आणि अंगठ्यात धरून बिडी सारखी ,आणि शेवटी अनामिक व करंगळीच्या बेचक्यात घरून चिलमी सारखी ओढून संपवली ! तात्याच सिगरेट पिणं एक सोहळाच असतो . !

"सुरश्या , तू रोज किती सिग्रेटी फुंकतोस ?"

" मी मोजत नाही ! वाटलं कि पितो ! "

"तरी ?"

"असतील सात -आठ "

" बापरे ! , दोन रुपयाला एक धरली , तरी पंधरा -सोळा रुपयाची राख करतोस ?"

" मी तसा विचार नाही करत . ! "

" रोज पंधरा रुपये म्हणजे महिना साडे चारशे ! वर्षाचे साडे पाच हजार !"

" साडे पाच नाही तर पाच हजार चारशे !" मी हिशोबातली चूक दाखवण्याचा गाढवपणा केला .

" गधड्या, शंभर रुपये मी व्याज गृहीत धरलाय ! म्हणजे दहा वर्षात व्याजा सह सुमारे साठ हजार ! वर तब्यतीचं नुकसान , दवाखाना ,औषध यांचे वेगळेच पैसे !"

" सोमण्या , हे मात्र अति होतंय ! सदा पैसे पैसे नाही करत तुझ्या सारखं ! पैश्या पेक्ष्या इतरही गोष्टी आहेत ! ' ठेवायची ' म्हटल्यावर चोळी -बांगडीचा विचार करायचा नसतो !"सोमण्या ना कधी कधी डोक्यात जातो .

" सुरश्या तुला कळत कस नाही ? आज फुल पगारात हे ' ठेवणं ' कदाचित तुला परवडत हि असेल , पण उद्या म्हातारा झाल्यावर ! झेपेल ? कदाचित तेव्हा तुला सांगायला मी नसेल ! अन माझ्या शिवाय कोण तुला असं खडसाहुन सांगणार? मित्र म्हणून ते माझेच काम आहे ना ?"

मी अंतर्मुख झालो. सोम्ण्याच्या बोलण्यात point होता.

बराच वेळ आम्ही दोघेही गपच होतो . मधेच तो ' येतो ' म्हणून निघून गेला .

एक दिवस अचानक शाम्या आजारी पडला . चार दिवस झाले ताप काही उतरेना . डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे हॉस्पिटलला ऍडमिट केले . शाम्याला जवळचे कोणीच नाही . मीच त्याच्या सोबत दवाखान्यात होतो . तेव्हड्यात तात्या आला .

" काय झालाय रे शाम्याला ?"

" माहित नाही , साल चार दिवसापासून ताप काही उतरत नाही . ग्लानीने डोळा पण उघडेना , मी घाबरलो ,तुला फोन लागेना . डॉक्टरन ऍडमिट करायला सांगितलं ! आलो घेऊन !"

" काय झालं असेल रे त्याला ? किती दिवस दवाखान्यात ठेवावं लागेल ?"

" माहित नाही , पण डॉक्टरला किडनी इन्फेक्शनची शंका आहे . "

"बापरे , ...... म्हणजे किडनी बदलावी ...... "

" अजून काही कन्फर्म नाही . "

" एक विचारू सुरश्या ? समज तशी वेळ आलीच , रावळनाथाच्या कृपेने तशी वेळ येऊच नये , पण आलीच तर माझी किडनी दिली तर चालेल कारे ? तू -- तू डॉक्टरांना विचारून ठेव ! मला ना डॉक्टरशी इंग्रजी बोलता येणार नाही अन मला भीती पण वाटते ... मघाशी शाम्याला काचेतून पाहिलं !. माकड, मलूल हुन पडलंय रे ! "

मला भडभडून आलं .... ! तात्या चा आवाज इतका कातर होता कि एकवेना ! माझा हि बांध फुटतो कि काय असे वाटत होते ! कसा बसा स्वतःस मी सावरत होतो ! खरे तर सोमण्याच हे रूप विरळच होत . तो शाम्या सारखा भावुक नाही . पक्का बुद्धीने वागणारा आणि विचार करणारा आहे.

" सुरश्या हे घे " त्याने एक नोटांचं पुडकं दिल . पाच हजार तरी असतील ! पै -पै जमा करून ठेवलेले ! चिक्कू , मख्खीचुस , म्हणून टोमणे ( त्यात काही माझे हि आहेत !) सहन करून जमवलेले पैसे !

" पण सोमण्या ........ "

" असू दे रे , दवाखाना म्हणलं कि पैसा लागतोच रे , आणि तू अन शाम्या शिवाय मला तरी कोण आहे ?, शाम्या यातून बाहेर पडलाच पाहिजे रे ! ...... माझा दादा , मोठा भाऊ , शाम्याचाच वयाचा !, डोळ्या समोर गेला रे !गरिबी , पैसा नव्हता ! उपचारा अभावी गेला ! त्या चटक्याने चिकटपणा अंगी चिटकला ! असा सगळ्याची बोलणी खाऊन पैसा जमवतो आणि ... आणि वृध्दाश्रमातल्या एखाद्या 'दादा'ला देऊन टाकतो ! तेव्हडाच थोडं समाधान मिळत !..... " तोंड फिरऊन आपले अश्रू लपवत तात्या सावकाश निघून गेला . मी त्याच्या पाठमोऱ्या ' श्रीमंत ' आकृती कडे पहात राहिलो ! कारण न जाणता मी "चिक्कू ' पणाच लेबल लावून मोकळा झालो होतो ! माझी मलाच लाज वाटत होती !

आपल्या आयुष्यात कोण याव हे बहुदा नियतीच्या हाती असाव . ते आपल्या हाती जरी असते तरी आपण , जी माणसे नियतीने आपल्या पदरात टाकलीत त्या पेक्षा उत्तम आपल्याला निवडता आली असती का नाही कोणास ठाऊक ?


Rate this content
Log in