शिक्षक (भावी पिढीचा शिल्पकार )
शिक्षक (भावी पिढीचा शिल्पकार )
गुरू शिष्य ही परंपरा भारतीय संस्कृती मधील एक
पवित्र भाग आहे .
आपल्या आयुष्यात बरेच जण आपल्याला काही तरी नवीन व चांगले शिकवत असतात संस्कृती चे ज्ञानाचे धडे शिकवतात. आपल्याला चांगला मार्ग दाखवणारे झालेल्या चुका समजून सांगणारे सर्वच आपले गुरू आहे .
पण आयुष्यातील पहिले गुरू आपले आई वडील
असतात .
आई पासून आपले अस्तित्व सुरू होते
बाबांनी आपल्याला संघर्षमय जीवन कसे जगायचे याचे धडे दिले यांनी आपल्याला घडविले
हे आपल्या जीवनातील पहिले गुरू .
शिक्षक आणि विद्यार्थी हे एकाच बागेतील वेगवेगळ्या रंगाचे फुलं असतात .
शिक्षक स्वतः मेणबत्ती प्रमाणे जळतो व आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतो.
काट्यावर सुध्दा हसत चालण्यासाठी प्रेरणा देतो
प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती शिक्षीत करण्यासाठी
अहोरात्र प्रयत्न करतो . हेच शिक्षक आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दाखवितात . योग्य दिशेकडे वाटचाली साठी
प्रेरित करतात .
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते
शिक्षकच चांगले चरित्र निर्मित करू शकतात .
त्यांच्यामुळे कोणी इंजिनिअर. लेखक .डॉक्टर . शास्त्रज्ञ असे अनेक क्षेत्रात प्रगती करतात .
त्यांच्या दिलेल्या ज्ञानामुळे आपण उंच यशाची शिखरे
गाठतो.
योग्य शिक्षणामुळे जगासमोर उभी राहण्याची व संघर्षाची
ताकद येते
पूर्वीचे लोकं शाळेत जाऊ शकत नव्हते ते अशिक्षित होते रात्र दिवस राबायचे त्यांना मोबदला सुद्धा खुप कमी मिळायचा त्यांच्या या अशिक्षित पनाचा चा फायदा गावातील पाटील व सरपंच घेत असे .
पण याच शिक्षकांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता रात्रीची शाळा चालू केली व्यवहाराची व अधिकाराची शिकवण या लोकांना दिली.
आपल्या या यशस्वी जीवनात शिक्षकांचा लाख मोलाचा वाटा आहे .
मोठ मोठ्या पदव्युत्तर होउन त्यांचे सन्मान होतात
पण या सन्मानाचे हक्कदार शिक्षक आहे.
