नवरात्री चे नऊ रंग (पिवळा)
नवरात्री चे नऊ रंग (पिवळा)
1 min
146
पिवळे तांबूस ऊन पडले चौफेर
झोके घेत वारा वाहे सोने वाटीत दूर ….
बागेमधला पिवळा झेंडू आज निराळाच फुलला
नव्या नवरीचा शालू जसा हळदीने माखला……
भिरभिर नारे फुलपाखरे ही करायला लागली दंगा
सुर सनई वाजवीत होता पिंगा घालणारा भुंगा……
रंग पिवळा आनंदाचा नवा आशेचा सूर्य किरणांचा
अवकाश सहित लागे त्रिभुवणी त्या सूर्यप्रकाशाचा……
