Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

1 min
245


लहरतो तिरंगा हा अभिमानाने 

उंच उंच उंच फडकतो या गगनात 

सदैव उजळत राहो तेज ध्वजाचे 

सार्‍या भारतीयांच्या मनामनात


करू या आदर नेहमीच आपण सारे

संविधानाचाही ठेवू या आपण मान

डाॅ.बाबासाहेबांनी केले संविधान

ठेवू याचा आपण सार्थ अभिमान


भारत देश जन्मभूमी या वीरांची

सरदार भगतसिंग अन् सावरकरांची

प्राणांची आहुती दिली देशासाठी 

प्रसन्न पहाट उगवली स्वातंत्र्याची


शहीदांच्या रक्तात भासे भगवा रंग

शांततेचे प्रतिक आहे धवल रंग

नील चक्र दाखवतो कामाचे तास

जीवन जगण्याचे वरदान देतो हिरवा रंग


सर्वधर्मसमभाव सर्वांच्या मनी वसू दे 

दया, क्षमा, शांतीचा निवास राहो मनामनात

माणुसकीचेही भान राहू दे सर्वांनाच

बंधूभावाची ज्योत तेवत राहो तनामनात


Rate this content
Log in