Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rama Khatavkar

Others

4  

Rama Khatavkar

Others

बरे झाले...

बरे झाले...

1 min
373


सुगी संपूनिया गेली, बरे झाले,

उडाली पाखरे सारी, बरे झाले !


दिलासाही नको झाला फुकाचा तो,

कुणाशी बोलले नाही, बरे झाले


कळीला लागुनी काटा कसा आला,

तिलाही काळजी नाही, बरे झाले


कलंडे ऊन्ह दु:खाने घरामागे,

सुखाला सावली झाली, बरे झाले.


किती गुंते मनाच्या आत ठेवावे

उकलल्या एकदा गाठी, बरे झाले


भिती हा दाखवी अंधार वातीला

दिशा उजळून ही आली बरे झाले


Rate this content
Log in