धन्यवाद शिक्षक
धन्यवाद शिक्षक
1 min
189
छात्र घडवतो थोर
असा महिमा जयांचा
मज घडविले ज्यांनी
आहे कृतज्ञ तयांचा .. १
लडिवाळ शिकविले
बळ अंगात दिधले
संकटांना झुंजण्याचे
अंगी सामर्थ्य घातले .. २
दंडवत शत शत
माझ्या थोर त्या गुरूंना
होती ज्यांची मजवर
खरी अपार करूणा .. ३
घडोघडी चेतवून
सारा काळोख झारला
हितगुज आपलीशी
मार्ग कल्याणा दावला .. ४
त्यांची भक्कम सोबत
हात पाठी आधाराचा
अजूनही ऋणी मी हो
माझ्या प्रिय शिक्षकांचा... ५
