STORYMIRROR

leena nathe

Others

3  

leena nathe

Others

आरोग्य हीच धनसंपदा

आरोग्य हीच धनसंपदा

1 min
145

सुखी निरोगी जीवन 

धन संपत्तीच गडे 

आनंदाचे उंच वारे 

इथे तिथे सर्वकडे ...१


मन सुंदर प्रसन्न 

गेला ताण कुणीकडे 

रोज सकाळी उठूनी 

घेता योगाभ्यास धडे...२


ध्यान,आसन,व्यायाम

ज्यास कराया आवडे 

लाभे मन शरीराचे 

स्वास्थ्य निकोप पारडे...३ 


संतूलाचे खाणेपिणे 

आरोग्याचे गुढ दडे 

सांभाळता नियमांना 

करामत भली घडे ...४


आरोग्यास जपा बहु 

कामधंदा एकीकडे 

जाई निघूनी संपदा 

होता दुर्लक्ष याकडे...५


Rate this content
Log in