STORYMIRROR

leena nathe

Others

3  

leena nathe

Others

पाऊस कधीचा पडतो आहे

पाऊस कधीचा पडतो आहे

1 min
250

पाऊस कधीचा पडतो आहे 

रिपरिप त्याची चालू आहे

सतंतधार वाहण्याने आता 

नद्या-नाल्या

 ओसंडून वाहे... १


ढगात गडगड गुडूम जसे 

आवाजाचे ताशे वाजे 

धरणीस बिलगणाऱ्या सरींनी 

देखणे सृष्टीचे रूप साजे... २


धरा सारी ओली झाली 

अन् देहास शहारणारे गारवे 

पावसाच्या धारां आडून 

दृश्य दिसे दृष्टीस हिरवे... ३


उंच इमारती भिजलेल्या 

छपरावरूनही पाणी पडे 

रस्त्यावरती तुडूंब ओहळ 

पाणीच पाणी सगळीकडे... ४


पाऊस कधीचा पडतो आहे 

घेऊन संगे आठवणींचे थवे 

हरवून टाकी मला कुठे 

क्षण वाटे ते हव हवे.... ५


Rate this content
Log in