ऋतुराज वसंत
ऋतुराज वसंत
1 min
145
लागे वसंत चाहूल
नवा झाडास पालव
मनी उल्हास जागवे
असा निसर्ग उत्सव ...१
मंद वाऱ्याची झुळूक
आशा भरते प्रचुर
क्षण सुखद आल्हाद
जातो निराशेचा खूर ...२
नैसर्गिक सुशोभन
घेई मनास वेधून
क्षीण जाऊनिया सारा
वाजे चैतन्याची धून ...३
सुगंधित्व पसरत
वृक्ष येती बहरून
चाफा, पळस, पांगिरा
करी रंग उधळण ...४
सौंदर्याने नटलेला
विविधांगी ऋतुराज
मन मोहवून घेतो
ऐसा निसर्गाशी साज...५
