STORYMIRROR

leena nathe

Others

3  

leena nathe

Others

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

1 min
197

आला पाऊस घेऊन

संगे जलधारांचे गाणे

बहु मौजेचे वाटे अंगावरती

थेंब टपोरे झेलत जाणे.... १


जमिनीला हे थेंब बिलगती

जशी मातेला तिची लेकरे

साथसंगतीचा नाच गुंजे असा

टिकल्या फोडील्या सणवारे... २


थेंबा मागून जलधारा येती

पुर्ण होतअसे मृदेची तृषा

सुगंध बहुगुणी दरवळला

वेगाने धावू लागली वर्षा... ३


चिखल साचला जमिनीवर

कवेत घेता घेता पाणी

चिखल पाहुनी तो सगळा

आठवली आजोबांची शिकवणी... ४


शाळकरी असता चाले माझा

चिखलासंगे घसरगुंडीचा खेळ

वाट काढावी घट्ट रूतवत अंगठा 

शिकवत होते बसवणे चिखलाशी मेळ.... ५


पाऊस आला घेऊन संगे

रम्य त्या आठवणीला

अनुभव पावसाचा सांगे 

जावे जिद्दीने सामोरे दु:स्थितीला... ६


Rate this content
Log in