स्त्रीशक्ती
स्त्रीशक्ती
1 min
152
नारी सृजनाची शक्ती
पूर्णत्वास जग नेई
वात्सल्याचा स्पर्श तिचा
ठाव हृदयाचा घेई ...१
असे जगत जननी
हाती पाळण्याची दोरी
भावी पिढीच्या गाठीशी
बांधी संस्कार शिदोरी ...२
कुटुंबाची शान वाढे
तीच शीला आधाराची
भक्कमता वाटे पाठी
शक्ती अन् विश्वासाची ..३
धैर्य अफाट दुर्दम्य
तीच जगाला उद्धारी
घडविले पराक्रमी
स्वतः ही लढली नारी...४
बुद्धिमत्ता असे भारी
व्यापलीये क्षेत्रे सारी
कर्तृत्वाचा झेंडा तिचा
घेतो सरस भरारी.....५
