सन्मान स्त्रियांचा
सन्मान स्त्रियांचा
नारीचे सौंदर्य लाघवी
तेज असे त्या सौंदर्याला,
कधी कधी हे रूपच ठरते
शाप तिच्या या आयुष्याला
नराधमांचे वादळ असती
तिच्याभोवती क्षणाक्षणाला,
म्हणूनच व्हावे धीट तिने आता
राहू नये सदैव तिने अबला
प्रत्येक नराधम हेच विसरतो
त्याची माताही नारी आहे,
तिच्याच पोटी जन्म घेऊनी
या जगात तो आला आहे
प्रत्येक स्त्रीने संस्कार करावे
मुलांवरी शिवरायांसमान,
तेव्हा कुणीही करणार नाही
या जगात स्त्रीचा अपमान
उत्पत्ती ही स्त्रियांमुळे हो
थोर तिचे हे उपकार,
स्त्री जातीमुळे जग हे टिकले
स्त्रीच जगाची पालनहार
