कथा बलिदानाची
कथा बलिदानाची
1 min
209
गाऊ त्यांना आरती
आठवु बलिदानाची गाथा
देशासाठी गेले फासावर
कधी झुकला त्यांचा माथा (1)
मोडले त्यानी सुखी संसार
घरावर ठेवले तुळशीपत्र
कोणी भुमीगत झाले
कोणी उचलले शस्त्र (2)
देशभक्ती अशी संचारली विज
देश रक्षणासाठी अर्पण प्राण
कुणी फासावर चढले
करु सगळ्याना प्रणाम (3)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
हेच बलिदानाचे सुवर्ण पान
विविधतापूर्ण संस्कृतीने
मिळवला जगात एकतेचा मान (4)
देशप्रेमाचे ,बलिदानाचे गिरवु धडे
असंख्य सूर्य तळपत राहतील
बंधुभावाचे समतेचे एकात्मतेचे
ध्वज तिरंगा फडकत राहतील (5)
