आई मायेचा सागर
आई मायेचा सागर
आई असते मायेची सावली
मायेने भरलेला असते कळस
रखरखत्या ऊन्हाचा ती गारवा
वसंतात फुललेले असते पळस
काळीज हळवे असते तिचे
रागावण्यात ही असतो गोडवा
आईच्या सोबतीत रोजच उत्सव
फिका पडतो दिवाळी पाडवा
विस्कटलेल जग पहातांना
आईची कुसच बरी वाटते
निर्दयी झाले सारे जग
तुझ्या जवळच सुरक्षित वाटते
लहानपणी कुठे मी पडता
आईच्या जीवाची घालमेल होई
प्रेमापोटी रागावुन मला ती
ओढीत घराकडे घेऊन जाई
जखम झाली कधी मला
आईच्या डोळ्यात ठिणगी पडते
हळहळ होते तिच्या ह्दयाची
पदरामागे ती एकटीच रडते
मला जग दाखवण्यासाठी आई
कठीण प्रसंग तुझ्यावर बेतला
जग पहायच होत मला म्हणून
जन्म तुझ्या पोटात घेतला
आई तुझ्या प्रेमळ मायेपुढे
आकाश हे ठेंगणे मज भासते
मी घेतली कितीही उंच भरारी
शांतता तूझ्याजवळ असते
आईला वृद्धाश्रमात ठेवू नका
तिच्या चेहर्यावर आनंद राहू द्या
कष्टाने उभे केलेल्या घरात
नातवंडाना खेळतांना पाहु द्या
