वटसावित्री
वटसावित्री
रमा .काय ग आज पुन्हा उशीर केला यायला. थोडं लवकर येत जा मला उशीर होतो ड्युटीवर जायला .
हो ताईसाहेब आज थोडं काम होत म्हणून वेळ झाला
ताईसाहेब मला ना थोडे पैसे हवे होते.
बरं किती देऊ काय ग कुठे बाहेर जायचं आहे का ?
तितक्यात रमा बोलली नाही हो ताईसाहेब मला पूजेचे सामान घ्यायचे आहे आणि मी उदया उशिरा येईल .
काय ग रमा कसली पूजा आहे!
ताईसाहेब तुम्ही विसरल्या की काय उद्या वटसवित्री पूजन आहे मला बायकांसोबत पूजा करायला जायचं आहे
का हो तुम्ही नाही करणार का पूजा !
त्यावर काही न बोलता ताईसाहेब बेड रूम मध्ये निघून गेल्या व रमाला सुद्धा बोलून घेतले.
अहो ताईसाहेब काम राहील की .
अग हो होईल काम तू बैस ईथे
बरं ठीक आहे म्हणत रमा सुध्दा तिच्या जवळ बसली
काय ग रमा तुझा नवरा दारू पितो भांडतो कधी कधी मारतो पण तरी तोच नवंरा सात जन्म मिळो म्हनून वडाची पूजा करते
हो ताईसाहेब दारू पितो व भांडतो तो माझ्या सोबत
पण पोरांना खूप जीव लावतो जे मागितले ते आणतो
दारू उतरली की मला पण जीव लावतो
बरं बाई ! रमा पण खरंच सात जन्म हाच नवरा मिळतो
का ?
ताई साहेब ते मला काय माहीत नाही. मी अडाणी पण जुन्या काळापासून ही प्रथा चालत आहे. ते श्रद्धेने सर्व करतात
ताईसाहेब तुम्ही बोलल्या ते पण खरं आहे.
कोणालाच माहीत नसते आपले किती जन्म आहे तरी बायका नवऱ्यासाठी उपवास करतात पूजा करतात आणि सात जन्म हाच नवरा मागतात .
सकाळची च गंमत सांगते आमच्या शेजारची राधाबाई आहे ना तिच्या मुलीला नवऱ्याने भांडण करून काढून दिले
मी तिला भेटायला गेली ती म्हणाली मला पण पूजेला यायचं मी पण हो बोलून आली
ताईसाहेब तुम्हाला राग येणार नाही तर एक वीचारू का ?
विचार ग मला नाही येत राग .
तुम्ही उदया पूजा नाही करणार का ?
नाही ग मी नाही कारणार पूजा .
का हो ताईसाहेब मालक तर आहे ना ते बाहेरगावी असतात एव्हडचं ना
हो ग बाई आहे ते बाहेरगावी पण एक जन्म पुरेसा झाला या जन्मात सुखाने जगून घ्यायचं पुढचा जन्म कोणी बघितला .
आणि हो माझ्या नवऱ्याची दुसरी बायको ती पण उपवास करणार पूजा करणार सात जन्मी हाच पती मागणार.
मग परत सात जन्म तोच अर्धवट संसार
नको मला हे सर्व
मनात किती दुःख असले तरी ते लपवत आनंदाने श्रद्धेने
आपली संस्कृती आपण जोपासतोचं.
बरं हे घे पैसे चल मी आता निघते
( ही कथा एक काल्पनिक आहे कोणाच्या ही भावना दुखावल्या जाणार नाही . आणि कोणाला वाईट वाटलेतर माफ करणे )
