वंजारी आरक्षण-
वंजारी आरक्षण-


दर दहा वर्षाच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात वंजारी समाजाचे आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण वाढत आहे. त्यामुळे वंजारी समाजाला लोकसंख्येच्याप्रमाणात 2%आरक्षण अत्यल्प आहे. त्यामुळे NT-D प्रवर्गासाठी 15%आरक्षणाची गरज आहे. हे मागासलेपण ग्रामीण व शहरी भागात आढळून येत आहे. त्यामुळे जो पक्ष आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करेल त्याच्या पाठीशी समाजबांधव राहणार आहेत. तसे आम्हांस लेखी आश्वासन देण्यात यावे. तसे मागासवर्गीय आयोगाने सर्व्हे करावा. फसवणाऱ्या पक्ष व नेत्यांना समाज मतदानातून धडा शिकवतील. काळाची पाउले ओळखून समाजाने वेळीच सावध होने काळाची गरज आहे अन्यथा समाज कायमचा दुर्लक्षित होईल. कुणाच्या ही आरक्षणाला धक्का न पोहचवता आरक्षण सर्व समाजाने पाठिंबा देऊन एक विचाराने विधानसभेत व विधान परिषदेत मांडावे व बहुमताने मंजूर करावे. ते कोर्टात टिकेल असे असावे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी निवडणुकी अगोदर समाजाला लेखी आश्वासन द्यावे.