विकत मिळत नाही
विकत मिळत नाही
मी आज अॅमेझॉन वरून एक वस्तू विकत घ्यायची ठरवली, म्हणे तीथे जगातले सर्वच गोष्टी मिळतात वर भरपुर डिस्कॉऊंट! नातलाने सांगितले, आजोबा तुम्ही मला जे गिफ्ट देणार ते अॅमेझॉन वरूनच आणायचे!
वारे माझ्या पठ्या! आठ वर्षाचाच आहे पण मी याला काही सांगायचे तर तोच मला सांगत असतो, तुम्हाला काही येत नाही, हे ठरलेले वाक्य!
मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार त्या मुळे कुठून कसे आणायचे हे सांगु नकोस!
त्याचा हट्ट चालुच होता मग मी म्हटले माझ्याकडे तुझ्यासारखा स्मार्ट फोन नाही, मग कसे अॉन लाईन अॅमेझॉन वरून मागवु? मला तर त्यातले कळतही नाही..
पठ्याला तर संधीच मिळाली परत तुम्हाला काही येत नाही म्हणायला व हसत सुटला, हसा हसा लोक हो असे मी मनात म्हटले, हसायला कुठे पैसे लागतात? व ते कुठे विकत मिळतय?
त्याची फिरकी घ्यायला मी म्हटलो तुझ्या स्मार्टं फोन वरून अॉर्डर करू आण तुझा मोबाईल इकडे.
अॉनलाईन शाळेमुळे त्याला वेगळा फोन घेऊन दिला होता! अभ्यास करायचा सोडून हे मुले त्याचा नको तसा वापर करत होते, बोलायला ही निट येत नाही पण अॉनलाईन, इंटरनेट वरून झोमॉठोवरून हे खायला मागव, अॉनलाईन शॉपिंग कर असा उद्योग करत बसतात, आईबापाचे लक्ष त्यांच्या अॉफिस कामात, गप्पांमध्ये, मुलाने क्रेडिट कार्ड कशासाठी मागितले हे न विचारत देऊन टाकले व वन टाईम पासवर्ड वैगरे सेव्ह करून घेतले मुलाने!
मोठ्या बढाईने सांगतात आपल्या अॉफिस कलिगला माझा मुलगा कसा हुशार आहे अॉनलाईन खाण, वस्तू मागवतांना!
मी बिचारा म्हातारा बापडा कपाळावर हात मारून घेण्या पलीकडे काही करू शकत नाही, एकतो कोण माझ?
आधी बर होत अॉफिसमध्ये जायचे तेवढ्या वेळ मला शांतता होती!
थोड्यावेळाने पठ्या घेऊन आला त्याचा मोबाईल माझ्या समोर! हं टाका तुम्हाला कोणती वस्तू विकत घ्यायचे त्याचे नाव! मी विचार करत म्हणालो तुच टाक मला जमणार नाही टाईप करायला! तो अजुन खुशीत ये म्हणाला बर सांगा, गिफ्ट त्याला पाहिजे होते म्हणून एकत होता माझ!
टाक H A S A, मग विचारतो कोणत्या कंपनीच आहे म्हणजे सोप जाईल शोधायला..
आता मीच हसायला लागलो कोणती कंपनी विकते हे? मलाही माहिती नाही. म्हटल टाक तुझ्या आजोबांच नाव!
त्याचा निरागस प्रश्न तुमची कंपनी आहे? मला कस माहिती नाही, मी तर तुम्हाला कधी काम करतांना पाहिलेच नाही! आई तर सतत म्हणत असते म्हातारा फुकट खातो काही पैसा कमवत नाही! माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या होत असलेले माझ्या लक्षात येताच त्याला म्हटले अरे शोध रे सापडत का हसा - HASA,
काही शोधुन लिस्ट समोर आली पण जे पाहिजे होत ते यात नव्हते!
पठ्या एक एक करून लिस्ट मध्ये शोधत होता, माया कडे बघत होता, वय जरी याच लहान असले तरी काही गोष्टी समजत होत्या, संस्कार, शिकवण योग्य पद्धतीने होणे गरजेचे होते!
बराच वेळ झाला, मग मीच त्याला म्हणालो अरे तुझ्या ह्या साईटवर ते नाही सापडणार, हसण असे विकत मिळत नाही!
आजोबा तुम्हाला माहित होत विकत मिळत नाही तरी का शोधायला लावता?
अरे मी सांगितले असते तर तुला पटले नसते!
म्हणून तुझ्या सोबत बसुन तुझे गिफ्ट मला जे द्यायचे ते तुला समजुन सांगायचे होते!
आणी आम्ही दोघे ही मनमुराद हसत सुटलो, आमचे हसण्याच्या आवाजाने, मुलगा व सुन पण जवळ आले व ते पण आमच्या हसण्या सामिल झाले!!!
