STORYMIRROR

Anuja Dhariya-Sheth

Others

3  

Anuja Dhariya-Sheth

Others

वासना की प्रेम

वासना की प्रेम

5 mins
828

श्वेता एक चांगल्या घरातली मुलगी.. १२ वीला चांगले मार्क्स मिळाले आणि गव्हर्नमेंटच्या चांगल्या अभियांत्रिकी विद्यापीठात म्हणजेच इंजिनीरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळावे म्हणून तिच्या बाबांनी खूप प्रयत्न केले. घरापासून थोडे लांब तरी ७०-८० किलोमीटर असलेल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली.. खूप छान कॉलेज होते.. त्यांचेच हॉस्टेल त्यामुळे राहण्याची सोय झाली.. बाबा खुश होते.. श्वेतासुद्धा खुश होती. नवीन कॉलेज, नवीन मित्र-मैत्रीणी, नवीन हॉस्टेल... तिचा हॉस्टेलवर राहायचा पहिलाच अनुभव होता... त्यामुळे थोडी घाबरली होती.. पण हळूहळू सर्व छान सुरू झाले, ओळखी झाल्या या नवीन वातावरणात ती रुळून गेली...


समीरला ती बघता क्षणी आवडली होती... अन् नेमके त्याच वर्षी त्याला इयर ड्रॉप होता... म्हणजेच सर्व विषय राहिल्यामुळे पुढच्या वर्गात जाता येणार नव्हते... कॉलेजला आला तरी टवाळक्या करणे, खोडी काढणे हेच त्याचे उद्योग होते... व्यसनी, उनाड अशी बरीच विशेषण त्याला लागू होत होती... दिसायला हॅंडसम.. त्यात श्रीमंत बापाचा त्यामुळे सतत पार्ट्या करणे आणि पैशाच्या जोरावर सर्वांना नमवणे... जे हवे तें मिळवण्यासाठी कोणत्याही पातळीवर उतरणे.. हाच त्याचा स्वभाव...


श्वेता त्याला एवढी आवडली होती की काही करून तिचा होकार मिळवायचा यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते... एक्झॅमसाठी नोट्स घेणे, पुस्तक घेणे अशी सुरुवात झाली... फोन नंबर मिळाला मग काय सारखे फोन करून बोलण्याचे निमित्त शोधत होता...


व्हॅलेंटाईन वीक आणि कॉलेजचे गॅदरींग यामुळे खूप धमाल होती... रोज तिला खूप वेग वेगळे गिफ्ट्स देऊन व्हॅलेंटाईन डेला त्याने तिला प्रपोज केले.. दिसायला छान असल्यामुळे तिलाही तो आवडत होता... पण त्याचे व्यक्तिमत्व तेवढे चांगले नाही हे ऐकून असल्यामुळे ती हो म्हणायला कचरत होती... नकार ऐकायची त्याला सवयच नव्हती... त्याने गोड बोलून मी किती बदललो आहे, तुझ्या प्रेमाने मला बदलून टाकलय.. आता मी पूर्वीसारखा राहिलो नाही असे बोलून तिला त्याच्या बोलण्यात हरवून टाकले.. तरी तिने दोन दिवस दे मला असे बोलून तिथून काढता पाय घेतला..


पण म्हणतात ना शेवटी प्रेम हे आधंळे असते... तसेच काहीस झाले.. तिला खरंच वाटलं माझ्यामुळे तो बदलला, माझ्यासाठी बदलला... त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा... तिची बुद्धी काहीच काम करत नव्हती.. हो नाही करत तिने होकार दिला... त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली... लेक्चर बुडवून फिरायला जाणे, पिक्चरला जाणे.. अशा गोष्टी होऊ लागल्या.. हळूहळू अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले.. मार्क्स कमी आले... घरी काय सांगू? असा प्रश्न तिला पडला.. पण अजून फायनल एक्साम बाकी होती... या वेळेस मात्र तिने खूप चांगला अभ्यास केला.. तिने भेटायला यायला नकार दिला तरी समीरसुद्धा तिला अडवू शकला नाही...


परीक्षा संपली, घरी जावे लागणार होते. एक-दीड महिना भेट होणाऱ नाही म्हणून दोघे आज डिनरला जाणार होते... जेवण आवरून लवकर हॉस्टेलवर यायचे होते.. कारण नियम कडक होते.. पण परत जायच्या आधी एक किस दे ना यार.. समीर म्हणाला.. आज त्याचा स्पर्श तिला वेगळा जाणवत असला तरी तिलादेखील हवाहवासा वाटत होता... आजपर्यंत कॉलेजमध्ये भेटत होते त्यामुळे थोडाफार स्पर्श होत असला तरी एवढ्या जवळ ते आले नव्हते.. ती लाजून हसली... त्याने गाडी एका कोपऱ्यात घेतली आणि तिचा चेहऱ्यावर हात फिरवत ओठावर अलगद ओठ टेकवले.. तिच्या पूर्ण अंगावर काटा आला होता... डोळे बंद करून तिनेसुद्धा त्याचा आनंद घेतला...


थोड्या वेळातच बाजूला होऊन म्हणाली उशीर होतोय.. त्याने परत तिला जवळ ओढत म्हटले बस अजून एकदाच... त्याच्या कुशीत ती हरवून गेली... परत भानावर येत तिने स्वतःला लांब केले.. आणि हॉस्टेलवर सोडायला सांगितलं...


त्या रात्री दोघेही बराच वेळ फोनवर बोलत होते.. दुसऱ्या दिवशी ती घरी आली.. तिचे लक्ष लागत नव्हते कशातच... सगळीकडे समीर दिसत होता.. इकडे समीरची भूक अर्धवट राहिली होती.. तो तिला सारखे चावट मेसेज करत होता... चॅटींग सुरूच होते..


सुट्टी संपत आली... रिज़ल्ट लागणार होता... पुढच्या वर्षाची ऍडमिशन घ्यायची होती.. बाबा सोबत आले होते... सर्व पूर्ण झाल्यावर बाबा घरी गेले... बऱ्याच दिवसांनी श्वेता आणि समीर एकमेकांना भेटले.. त्याच्या नजरेने ही लाजून चूर होत होती... आज रात्री परत त्याने तिला भेटायला बोलावले.. तिलाही हे सर्व हवे होते.. पण त्याच्या मनात काही वेगळेच होते...


ती भेटायला आल्यावर समीरने तिला मिठीत घेतले आणि त्याचा कंट्रोल गेला.. ओठ, मान.. असे करत हळूहळू त्याने सगळीकडे स्पर्श करायला सुरुवात झाली.. श्वेताने दूर लोटले नकार दिला... हे चुकीचं आहे आपण घाई करतोय... असे ती म्हणाली.. छोट भांडण झालं आणि ती तिथून निघून गेली...


समीरने मग तिची माफी मागितली... परत काही दिवस बरे चालले होते... पण नकार ऐकेल तो समीर कसला? परत त्याची गाडी मूळ पदावर आली... आजकाल सगळे करतात ग... योग्य ती काळजी घेतली की काही नाही... असे उलट सुलट बोलून तिचे मन वळत नाही हे बघितल्यावर तुझे प्रेमच नाही... विश्वासच नाही असे म्हणत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली....

शेवटी त्याच्यापुढे तिने हार मानली... त्याने तिला नाईट आऊटला नेले.. घरी खोटे बोलून हे असे करणे तिला पटत नव्हते... त्याने स्पर्श करताच ही हरवून गेली... अन हळूहळू मर्यादेच्या सर्व सीमा पार झाल्या... ती त्याला तिचं सर्वस्व देऊन बसली... त्या अवस्थेतच दोघांना झोप लागली... थोडयाच वेळात तिला जाग आल्यावर ती रडू लागली... हे चूक आहे आपल्याकडून चूक झाली... समीरने तिची समजूत काढली... त्याच्या बोलण्यात ती भूलत गेली.. हळूहळू प्रमाण वाढले.. तिने नकार दिला तर तो आकांडतांडव करी... परत ती हार मानून तयार होई... आता तिला प्रेम कमी आणि वासना जास्त दिसत होती... पण काही उपयोग नव्हता... आपल्या हातून अपराध झाला आहे हे जाणवत असून ती काहीच करू शकत नव्हती..


शेवटचे वर्ष आले तसे तिने लग्नाचा विषय काढायला सुरुवात केली.. त्यांचे नाते आता सगळ्या कॉलेजला माहित झाले होते... दर वीकएन्डला आता एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते.. व्हायला नको तेच झाले.. श्वेता प्रेग्नन्ट होती.. आता काय? तिने समीरला सांगितल तर तो म्हणाला... आपण करू काहीतरी... पाडून टाकू... ती पुरती खचली... काय करावे कळतच नव्हतं.. हॉस्टेलवरून बातमी लीक झाली आणि सगळीकडे चर्चेला उधाण आले.. त्यांना कॉलेजकडून डिसमिस केले गेले.. घरी नोटीस गेली.. बाबांनी नाते तोडले.. समीर पण नीट वागत नव्हता...


बाहेर तोंड दाखवायला जागा नाही... आता काय करू असा विचार करत असतानाच नको ते पाऊल तिने उचलले आणि सर्व मुली कॉलेजला गेल्या असताना हॉस्टेलच्या बाथरुममध्ये तिने स्वतःला जाळून घेतले... स्वतः केलेल्या अपराधाची अशी शिक्षा करून घेतली... ६०-७०℅ भाजली गेली होती... दवाखान्यात हलवले गेले तरी घरचे आई-बाबा यांनीं कोणीच दखल घेतली नाही... दोन दिवसांतच ती हे जग कायमचे सोडून निघून गेली... पोलीस केस झाली आणि समीरला अटक करण्यात आली... एका चुकीची खूप मोठी शिक्षा तिने स्वतःला करून घेतली... अन् त्याचा त्रास मात्र तिच्या आई-बाबांना झाला.... मुलीच्या मरणाचे दुःख पचवणे त्यांना कठीण जात होते.. कितीही वाईट वागली तरी त्यांची मुलगी होती ती... पण परिस्थितीच अशी होती की त्यापुढे त्यांनी हार मानली...


आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो, कॉलेजचे प्रेमवीर आणि त्यांचे सुरू असलेले काही चाळे हो मुद्दाम चाळे हा शब्द वापरला मी... कारण हल्ली प्रेम म्हणजे फ़क्त फ़क्त आणि शरीरसंबंध एवढेच दिसून येते... खरे प्रेम करणारे असतातच नाही असे नाही पण हल्ली अशी उदाहरण खूप दिसून येतात.


Rate this content
Log in